तीन नवीन राफेल विमानांचा फ्रान्स ते भारत नॉन स्टॉप प्रवास; युएईमध्ये हवेतच भरलं इंधन


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बुधवारी रात्री ११ च्या सुमारास तीन नवीन राफेल फायटर जेट विमानं फ्रान्समधून भारतात दाखल झाली आहे. गुजरातमधील जामनगर एअर बेसवर रात्री ११ च्या आसपास या राफेल विमानांच्या तुकडीने लॅण्डींग केलं. Non-stop travel of three new Raphael aircraft from France to India

फ्रान्समधून उड्डाण घेतल्यानंतर ही राफेल विमान कुठेही न थांबता थेट भारतात पोचली. विशेष म्हणजेच या उड्डाणादरम्यान युएईच्या मदतीने या विमानांना एअर टू एअर री फ्यूलिंगच्या माध्यमातून हवेतच इंधन भरण्यात आलं. या नव्याने दाखल झालेल्या राफेल विमानांमुळे भारतीय हवाई दलाची ताकद चार पटींनी वाढली आहे.



या तिन्ही राफेल विमानांना अंबाला येथील गोल्डन एरो स्क्वाड्रनमध्ये समाविष्ट करुन घेण्यात येणार आहे. या तीन नवीन राफेल विमानांमुळे आता भारतीय वायुसेनेकडे असणाऱ्या राफेल विमानांची संख्या १४ पर्यंत गेली आहे. राफेल विमानांची पुढील तुकडी एप्रिल महिन्यामध्ये भारतामध्ये दाखल होणार आहे. यापुढील तुकडीतील राफेल विमानं ही उत्तर बंगालमधील हाशिमारा एअरबेसवर तैनात करण्यासंदर्भात विचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.  अंबाला एअरबेसवर राफेलचे पहिले स्क्वॉड्रन नियुक्त करण्यात आलं होतं.

 

भारतीय हवाई दलाच्या सर्वात महत्वाच्या एअरबेसपैकी एक असल्याने अंबाला एअरबेसला विशेष महत्व आहे. या एअरबेसपासून अवघ्या २२० किमीवर भारत पाकिस्तानची सीमा आहे. राफेल विमानांचे दुसरे स्क्वॉड्रन पश्चिम बंगालमधील हासिमारा एअरबेसवर तैनात करण्यात आलं होतं. त्यामुळे एकाच वेळी पाकिस्तान आणि चीनच्या जवळच्या एअरबेसवर ही राफेल विमानं आधीपासून तैनात असून नव्याने दाखल होणारी विमानं याच स्क्वॉड्रनमध्ये सहभागी होतील.

अधिकृतपणे मागील वर्षी १० सप्टेंबर रोजी अंबाला एअरबेसवर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये राफेलची पहिली तुकडी भारतीय हवाईदलामध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये तीन राफेल विमानांची दुसरी तुकडी भारतात दाखल झाली होती. नंतर या वर्षी २७ जानेवारी रोजी आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखल झाली होती.  भारत आणि फ्रान्सदरम्यान २०१६ साली सप्टेंबर महिन्यात झालेल्या करारानुसार भारत ३६ राफेल विमानं खरेदी करणार आहे. यासाठी ५९ हजार कोटींचा करार करण्यात आला आहे.

भारतीय हवाई दलाने राफेल फायटर जेट हे गेम चेंजर ठरतील असं म्हटलं आहे. या विमानांमुळे भारताला आपल्या हवाई क्षेत्रावर शेजारच्या देशांपेक्षा अधिक चांगलं नियंत्रण ठेवण्यास मदत मिळणार आहे. तसेच युद्ध झाल्यास राफेल विमानं ही खूप फायद्याची ठरतील असं सांगितलं जात आहे. लडाखच्या आकाशामध्ये घिरट्या घालणाऱ्या या विमानांनी चीनला काही महिन्यांपूर्वी सूचक इशारा दिलाय.

Non-stop travel of three new Raphael aircraft from France to India

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात