सुपरस्टार रजनीकांत यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांकडून घोषणा

Dadasaheb Phalke Award To Rajinikanth, Union Minister Prakash Javadekar announces

Dadasaheb Phalke Award To Rajinikanth : बॉलीवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार रजनीकांत यांना सिनेजगतातील सर्वात मोठा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली. रजनीकांत यांना 3 मे रोजी 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. Dadasaheb Phalke Award To Rajinikanth, Union Minister Prakash Javadekar announces


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बॉलीवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार रजनीकांत यांना सिनेजगतातील सर्वात मोठा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली. रजनीकांत यांना 3 मे रोजी 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.

प्रकाश जावडेकर पत्रकार परिषदेत म्हणाले, देशातील सर्व भागांतील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना वेळोवेळी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. यावर्षी महानायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करतानाही आम्हाला आनंद होत आहे. रजनीकांत गेल्या 5 दशकांपासून सिनेविश्वावर राज्य करत आहेत, रसिकांचे मनोरंजन करत आहेत. यामुळेच यावेळी दादासाहेब फाळके पुरस्काराच्या ज्युरींनी रजनीकांत यांना हा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे.

दक्षिणेत रजनीकांत यांना चाहते मानतात देव

रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरूमधील एका मराठी कुटुंबात झाला. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी मेहनत व धडपडीमुळे केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर बॉलीवूडमध्येही मोठे नाव कमावले. दक्षिणेत रजनीकांत यांना थैलेवा आणि भगवान म्हणतात. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे.

वयाच्या 25 व्या वर्षी मिळाला पहिला चित्रपट

रजनीकांत यांनी वयाच्या 25 व्या वर्षी फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यांचा पहिला तामिळ चित्रपट ‘अपूर्व रागनागल’ होता. या सिनेमात त्यांच्याबरोबर कमल हासन आणि श्रीविद्यादेखील होते. 1975 ते 1977 दरम्यान त्यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये कमल हासनबरोबर खलनायकाची भूमिका केली होती. त्यांचा पहिला ‘भैरवी’ हा तमिळ चित्रपट मुख्य भूमिकेत आला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला आणि रजनीकांत सुपरस्टार झाले.

स्टाइलचे बादशहा रजनीकांत

दक्षिणेत यशाचे शिखर गाठल्यावर रजनीकांत यांनी बॉलीवूडमध्येही नशीब आजमावले. ‘अंधा कानून’ चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. बॉलीवूडमध्येही आपल्या दमदार अभिनय आणि खास स्टाइलने त्यांनी प्रेक्षकांना वेड लावले. त्यांची सिगारेट फ्लिप करण्याची स्टाइल असो किंवा नाणे झेलण्याची स्टाइल किंवा चष्मा घालण्याची आणि हसण्याची स्टाइल चाहत्यांना पसंत पडली. रजनीकांत यांची स्टाईल केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही कॉपी करण्यात आलेली आहे.

Dadasaheb Phalke Award To Rajinikanth, Union Minister Prakash Javadekar announces

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात