फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात महाराष्ट्रासाठी रेल्वे विकासाचे हायस्पीड निर्णय; कोणते ते वाचा!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात महाराष्ट्रातील रेल्वे विकासाचे हायस्पीड निर्णय घेण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली. या भेटीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. High-speed rail development decisions for Maharashtra during Fadnavis’ Delhi visit

हे निर्णय पुढीलप्रमाणे :

  • धरावी पुनर्विकास साठी रेल्वेची जमीन मिळवण्याच्या मंजुरी.
  • समृद्धी महामार्गच्या पॅरालल हायस्पीड ट्रेन आणि हाय स्पीड कार्गो साठी मंजुरी
  • मुंबई – सोलापूर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी, आणि होकार.
  • नाशिक – पुणे हाय स्पीड रेल्वे बाबतचा प्रस्ताव.
  • नागपूर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि आधुनिकीकरण यासाठीचा 487 कोटी रुपयांचा कार्यादेश जारी करण्यात आला आहे.
    यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर अनेक चांगल्या प्रवासी सुविधा उपलब्ध होणार असून, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयी मिळणार आहेत. याभागातील सामाजिक-आर्थिक विकासाला सुद्धा यामुळे चालना मिळेल.
  • या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्वतः फडणवीस पाठपुरावा करीत होते. 18 ऑक्टोबर 2022 रोजी हा कार्यादेश जारी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे नागपूरकरांच्या वतीने फडणवीसांनी आभार मानले.

High-speed rail development decisions for Maharashtra during Fadnavis’ Delhi visit

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात