Heavy rains : राज्यभरात पावासाचं धुमशान! अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार कोसळला

Heavy rains  मुंबई, ठाणे, पुण्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुसळधार पावसामुळे दोन उड्डाणे वळवण्यात आली आहेत, तर अनेक उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे.

बीएमसीने सोशल मीडियावर लिहिले की भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी उद्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उद्या, गुरुवार 26 सप्टेंबर 2024 रोजी मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासन मुंबईकरांना अत्यंत आवश्यक असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याची विनंती करते.


Akshay Shinde : अक्षय शिंदेच्या मृत्यूचे रहस्य पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उघड


तर पुण्यातही भारतीय हवामानशास्त्र विभाग मुंबई यांनी वादळ व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या अतिदक्षतेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

त्याच वेळी, मुंबई पोलिसांनी ट्विटरवर पोस्ट केले की IMD ने 26 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत मुंबई आणि उपनगरात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सर्व मुंबईकरांना विनंती आहे की अत्यावश्यकतेशिवाय घरातच राहावे. कृपया सुरक्षित रहा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत 100 नंबर डायल करा.

Heavy rains in many districts across the state

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात