वृत्तसंस्था
मुंबई : आरोग्य विभागाची परीक्षा आता २४ व ३१ ऑक्टोबरला होणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री टोपे यांनी केली. त्यामुळे परीक्षा होणार असल्याने विद्यर्थ्यामध्ये चैतन्य पसरले आहे.Health department exams now in October; To be held on 24th and 31st: Health Minister Tope’s announcement
आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांसाठी २५ आणि २६ सप्टेंबरला घेतली जाणारी लेखी परीक्षापुढे ढकलली होती. यामुळे विद्यार्थी संतापले होते. भाजपाने सरकारवर जोरादार टीका सुरू केली होती. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षांच्या नव्या तारखा निश्चित झाल्याचे जाहीर केले.
आता गट – क संवर्गाची परीक्षा २४ ऑक्टोबर व गट – ड संवर्गाची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी घेण्याचा निर्णय सोमवारी आरोग्य विभाग व न्यासा कंपनीच्या अधिकऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत घेतला आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, दोन्ही दिवशी रविवार असल्याने, शाळा शंभर टक्के उपलब्ध होतातच. या अनुषंगाने या तारखा निश्चित केल्या आहेत.
डॅशबोर्डवर सगळ्या परीक्षा केंद्रांची यादी दिली पाहिजे, विद्यार्थ्यांची यादी डॅशबोर्डवर दर्शवली गेली पाहिजे. हे त्यांनी एक वेळापत्रक देऊन एक साधारणपणे १ ऑक्टोबरला त्यांनी डॅशबोर्ड द्यावा. संबंधित शाळांनी देखील या परीक्षा केंद्रांना मान्यात दिलेली असली पाहिजे.
त्यामुळे योग्यप्रकारे ऑडिट करण्याचं काम होईल. त्यांना असं बंधनकारक केलं आहे जे अगोदर देखील केलेलं होतं की, ९ दिवस अगोदर सर्व परीक्षार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले पाहिजेत.याबाबत देखील खात्री केली जाईल.तसेच, ”मला एवढचं सांगायंचं आहे की कुणीही कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App