प्रतिनिधी
मुंबई : नवी दिल्ली – मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन केंद्र सरकारने नियम बदलून आणि नियम डावलून जीव्हीके ग्रुपकडून अदानी समूहाला दिल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काल संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांची नावे घेऊन केला होता. ते सर्व आरोप जीव्हीके कंपनीने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले. इतकेच नाही, तर मुंबई विमानतळाचे संचालन अदानी समूहाकडे देण्यासाठी कोणाचाही कोणताही दबाव नव्हता, असा स्पष्ट खुलासा जीव्हीके ग्रुपने करून सुद्धा विरोधकांनी आपल्या जुन्याच आरोपांची टेप पुन्हा वाजवली आहे. gvk group answered to every alligation by rahul gandhi but oppositon tuned the same alligations
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडने जीव्हीकेकडून मुंबई विमानतळ जुलै 2021 मध्ये विकत घेतले होते. या संदर्भात जीव्हीके ग्रुपचे उपाध्यक्ष संजय रेड्डी यांनी खुलासा केला आहे. दोन कंपन्यांमधील या कराराच्या सुमारे एक वर्ष आधी जीव्हीके निधी उभारणीकडे लक्ष देत होतो. कारण जीव्हीके विमानतळ होल्डिंग कंपनीमध्ये सुमारे 10 वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. जेव्हा आम्ही बंगळुरू विमानतळावर गेलो. त्याचे कर्ज थकीत होत होते. त्यामुळे आम्ही गुंतवणूकदारांशी चर्चा करत होतो. आम्ही तीन गुंतवणूकदारांशी करार केला आहे. जरी ते अनेक अटी लादत होते. मग कोविड आला आणि विमानतळाचा व्यवहार तीन महिने ठप्प झाला. पैसे आले नाहीत. त्यामुळे कर्ज भरण्याचा मोठा दबाव निर्माण झाला होता. त्याच वेळी अदानी समूहाचा प्रस्ताव आला. त्यांनी एका महिन्यात पैसे देण्याचे कबूल केले. ही कबुली जीव्हीकेसाठी महत्त्वाची होती. कारण त्यातून जीव्हीकेला कर्जदारांचे कर्ज परत करता येणार होते. त्यामुळे जीव्हीकेने तो व्यवहार केला, असा स्पष्ट खुलासा संजय रेड्डी यांनी केला आहे.
The fact remains that airport in Mumbai changed hands at the speed of light:– 26 June 2020 CBI registered a case against GVK– 1 July CBI raided them– 7 July ED registered money laundering case&summons by CBI– 31 Aug agrement signed to handover the airports to Adani Group. — Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) February 8, 2023
The fact remains that airport in Mumbai changed hands at the speed of light:– 26 June 2020 CBI registered a case against GVK– 1 July CBI raided them– 7 July ED registered money laundering case&summons by CBI– 31 Aug agrement signed to handover the airports to Adani Group.
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) February 8, 2023
मात्र खुद्द जीव्हीके कंपनीने केलेल्या स्पष्ट खुलाशावरही विरोधकांचे समाधान झालेले नाही. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राहुल गांधींनीच लोकसभेत उपस्थित केलेले मुद्दे आपल्या ट्विटर हॅडलवर पुन्हा उपस्थित केले आहेत. जो घटनाक्रम अथवा क्रोनोलॉजी आधीपासून माहिती आहे, तीच क्रोनोलॉजी प्रियांका चतुर्वेंदींनी पुन्हा शेअर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात या सर्व आरोपांवर लोकसभेत प्रत्युत्तर देणे अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App