अदानी ते मोदी, खर्गे ते राहुल – संसदेत विरोधकांच्या आरोपांच्या समाचारासाठी पंतप्रधानांची तोफ सज्ज, दुपारी ३.०० नंतर पंतप्रधानांचे उत्तर


प्रतिनिधी

नवी दिल्ली : मल्लिकार्जून खर्गे ते राहुल गांधी यापैकी प्रत्येक विरोधकांनी संसदेत अदानी मुद्द्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन त्यांना घेरल्यानंतर विरोधकांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचे प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ सज्ज झाली आहे. pm narendra modi to give all out answers to alligations by rahul gandhi in parilament

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी ३.०० वाजल्यानंतर लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदी लोकसभेत उत्तर देणार आहेत. त्यावेळी ते राहुल गांधी यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचा समाचार त्यांच्याच आक्रमक भाषेत घेणे अपेक्षित आहे. राहुल गांधींनी अदानी –हिंडेनबर्ग प्रकरणावर लोकसभेत काल मोदींवर आरोपांची माळ लावली होती. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ते मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अदानींच्या संपत्तीत किती प्रचंड वाढ झाली, याचे काही  आकडेवारीसह दावे काल राहुल गांधींनी लोकसभेत केले होते.



आज त्याचीच पुनरावृत्ती मल्लिकार्जून खर्गे यांनी राज्यसभेत केली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी बोफोर्स प्रकरणाचा अदानी प्रकरणाच्या रूपाने बदला घेण्याची संसदेत तयारी केल्याचे दिसले. संसदेबाहेरही पक्षाने जोरदार आंदोलन केले.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी ३.०० नंतर राहुल गांधी आणि बाकीच्या विरोधकांनी केलेल्या आरोपांच्या त्यांच्याच आक्रमक भाषेत समाचार घेणे अपेक्षित आहे. मोदींच्या संसदेतील भाषणांचा हा जुनाच अनुभव आहे.

राहुल गांधींनी सावरकरांच्या कथित माफीनाम्याच्या मुद्द्यावरून भाजपला आणि केंद्र सरकारला जेव्हा लोकसभेत आणि बाहेर घेरले होते, तेव्हा पंतप्रधान मोदींनी, आजादी के लिये चापेकर बंधू, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आजाद ने आपनी जान खपाई थी. लेकिन उन्हे तो लगता है की आजादी एक परिवारने दिलाई है, अशा शब्दांनी समाचारा घेतला होता. लोग मोदी को दंडे मारेंगे असे जेव्हा राहुल गांधी म्हणाले होते, तेव्हा मैं आपनी पीठ इतनी मजबूत करूंगा की मैं लोगों के दंड सहन कर सकू. मैं सुर्यनमस्कार की संख्या बढा दुंगा, असे मोदी म्हणाले होते.

आता जेव्हा राहुल गांधींनी अदानी मुदद्यावरून पंतप्रधान मोदींना थेट नाव घेऊन घेरले आहे, तेव्हा मोदी देखील आपल्यावरील आरोपांची सव्याज परतफेड केल्यावाचून राहणार नाहीत याची झलक त्यांनी आधी दाखवली आहे. आज ते कोणत्या भाषेत प्रत्युत्तर देतात, याची आता सर्वांना उत्सुकता आहे.

pm narendra modi to give all out answers to alligations by rahul gandhi in parilament

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात