विशेष प्रतिनिधी
सातारा : Devendra Fadnavis शरद पवार नेहमी सांगत असतात की भाकरी फिरवली पाहिजे. त्याप्रमाणे उत्तर कराडमध्ये आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, तुम्ही भाकरी फिरवा, मी २५ वर्षांचा बॅकलॉग भरून काढतो, अशी हमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.Devendra Fadnavis
कराड उत्तरमधील भाजपाचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या कराड तालुक्यातील पाली खंडोबाची येथील प्रचार सभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, आपल्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो आणि टेंभू, म्हैसाळसारख्या योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागाचा चेहरा बदलण्याचं काम केलं. आमदार नसताना कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडेंनी ९९० कोटी रुपयांचा निधी आणला. आपले आशीर्वाद मिळाले तर २५ वर्षाचा बॅकलॉग भरुन काढू.
महायुती सरकारने अंमलात आणलेल्या लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण, एसटी प्रवासात सवलत, मुलींना मोफत उच्चशिक्षण या सर्व योजना भविष्यातही सुरू राहतील, असं देवेंद्र फडणवीसांनी ठामपणे सांगितलं. महायुतीच्या उमेदवाराला आपण आशीर्वाद दिला तर कराड उत्तरला मागे वळून बघावं लागणार नाही. आपल्या विकासाची हमी आम्ही घेतो, असा शब्दही फडणवीसांनी दिला.
महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात. आपण त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे, असं आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याची प्रगती सुरु आहे. या सरकारच्या काळात चांगल्या योजना राबवल्या गेल्या आहेत. काही लोक फक्त नाकर्तेपणा लपवण्यासाठी फडणवीसांवर चिखलफेक आणि व्यक्तिद्वेषातून टीका करत असल्याचा आरोपही उदयनराजेंनी यावेळी बोलताना केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App