विशेष प्रतिनिधी
पुणे : उरुळी कांचन येथील शेतकऱ्याने अनोखा प्रयोग करत जमिनीतून ३८ फूट उंचीवर द्राक्षाचे वेल वाढवत नेले.टेरेसवर सुमारे १२०० से स्वेअर फूट मापाचा मंडप उभारून त्यावर हे दोन द्राक्षाचे वेल चांगल्या प्रकारे वाढविले. वेलीची चांगली वाढ झाली.Grape garden on terrese; 450 bunch flourished Odd experiment of Urulikanchan Farmer
ऑक्टोबर छाटणी करून द्राक्षाचा बहार धरण्याचा निर्णय घेतला. आज या दोन द्राक्षाच्या वेलींना सुमारे ४५० घड काळ्याभोर द्राक्षांनी लगडले. त्यांची वाढ जमिनीवर ज्या पद्धतीने द्राक्ष पीकाचे घड वाढतात त्याप्रमाणे झाली.
या प्रयोगाचे परिसरातूनच नाही तर राज्यभरातून कौतुक होत आहे. कृषी विभागाच्या व द्राक्ष संशोधन केंद्राच्या अनेक अधिकाऱ्यांनी संशोधकांनी या ठिकाणी येवून माहिती घेतली आहे. प्रयोगशील शेतकरी भाऊसाहेब पांडुरंग कांचन यांनी टेरेस द्राक्ष बागेचा प्रयोग करून तो यशस्वी केला.
इच्छाशक्ती असेल तर जमिनीवरच काय पण टेरेसवर पण द्राक्ष शेती होऊ शकते हे सिद्ध केले. द्राक्षे जानेवारीच्या २५ तारखेपर्यंत पूर्ण वाढ होऊन ज्यूस व त्यापासून अन्य प्रकारचे खाद्यप्रकार करण्यासाठी व औषधी वापरासाठी करण्यायोग्य होतील अशी माहिती कांचन यांनी दिली.
६ वर्षांपूर्वी मांजरी येथील द्राक्ष संशोधन केंद्रातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे विकसित केलेली काळ्या जांभळ्या रंगाच्या बेंगलोर पर्पल या सुधारित द्राक्ष वाणाची आठ रोपे आणली व आपल्या घराच्या सीमा भिंतीजवळ ती लावली. या रोपांची सेंद्रिय पद्धतीने जोपासना केली. चार रोपे जळाली. त्यापैकी दोन रोपे चांगल्या प्रकारे वाढ करू लागली. या दोन रोपांना भाऊसाहेब यांनी भिंतीचा आधार देत बंगल्याच्या टेरेसवर सुमारे ३८ फूट उंचीपर्यंत वाढवीत नेले.
टेरेसवर फुलवली सुंदर द्राक्ष बाग. पुणे जिल्ह्यात पूर्वी उरुळी कांचन हे गांव द्राक्ष पिकाच्या शेतीसाठी जगाच्या नकाशावर असलेले गांव होते पण तेथे आता द्राक्ष बागा नावाला उरल्यात असेच म्हणावे लागते पण तेथील जमिनीवर जसा द्राक्षाच्या करू लागली या दोन रोपांना माऊसाहेब भिंतीचा
आधार देत आपल्या बंगल्याच्या टेरेसवर सुमारे ३८ फूट उंचीपर्यंत वाढवीत नेत जमिनीवर जसा द्राक्षाच्या वेलीला मंडप घालून द्राक्षबाग फुलविली जाते त्याप्रमाणे हे लक्षात आल्यावर त्यांनी त्यांची ही
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App