अभिनेता सोनू सूदच्या माध्यमातून कॉँग्रेसचा नवज्योत सिंग सिध्दूवर निशाणा, चरणजिसिंग चन्नीच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे दिले संकेत


विशेष प्रतिनिधी

चंदीगड: पंजाबमध्ये बहिणीला कॉँगेसची उमेदवारी मिळाल्यावर अभिनेता सोनू सूद चांगलाच सक्रीय झाला आहे. मात्र, त्याच्याच माध्यमातून कॉंग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार विद्यमान मुख्यमंत्री चरणजिसिंग चन्नीच असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सिध्दू यांचा चांगलाच तिळपापड झाला आहे.Congress targets Navjot Singh Sidhu through actor Sonu Sood, hints Charanjisingh Channy is CM candidate

अभिनेता सोनू सूदचा व्हिडिओ काँग्रेस पक्षाच्या मुख्य ट्वीटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. ‘बोल रहा पंजाब, अब पंजे के साथ- मजबूत करेंगे हर हाथ’ अशी टॅगलाइन वापरत काँग्रेसने हा व्हिडिओ अधिकृत ट्वीटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, खरा मुख्यमंत्री वा खरा राजा तोच असतो ज्याला त्या पदावर लोकाग्रहामुळे आणावं लागतं.



ज्याला खुचीर्साठी स्ट्रगल करावं लागत नाही. मी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आहे असा डंका पिटवावा लागत नाही. मलाच ते पद मिळायला हवे असा हट्ट धरावा लागत नाही, तेच खरे नेतृत्व असते असे मला वाटते. बॅक बेंचरमध्येही नेतृत्वाची क्षमता असते हे लक्षात घेत योग्यता ओळखून एखाद्या व्यक्तीकडे नेतृत्व दिलं गेल्यास ती व्यक्ती राज्यात, देशात बदल घडवू शकत.

सोनू सूदच्या संदेशानंतर चन्नी यांची काही व्हिज्युअल्स टाकून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे. त्यातून चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळेच नवज्योतसिंग सिद्धू आणि चन्नी यांच्यात नवा संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, पंजाबमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असणार, असा प्रश्न सिद्धू यांना विचारण्यात आला असता त्यांनी मोठे विधान केले होते. काँग्रेस हायकमांड नाही तर पंजाबची जनता पुढचा मुख्यमंत्री ठरवणार आहे, असे सिद्धू म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेसने चन्नी यांना प्रोजेक्ट करणारा व्हिडिओ जारी केल्याने सिद्धू यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Congress targets Navjot Singh Sidhu through actor Sonu Sood, hints Charanjisingh Channy is CM candidate

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात