विशेष प्रतिनिधी
चेन्नई: स्वत:ची ओळख मिळविण्यापूर्वी रजनीकांतचा जावई म्हणून ओळख असलेल्या अभिनेता धनुषने घटस्फोट घेतला आहे. रजनीकांतची मुलगी ऐश्वर्यापासून आपण घटस्फोट घेत असल्याची पोस्ट केली आहे.Actor Dhanush divorces Rajinikanth’s daughter
तब्बल १८ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे वेगळे होत आहेत. धनुषने ट्विटरवर अत्यंत छोटी पोस्ट लिहून घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. १८ वषार्ची सोबत. मैत्री, पती-पत्नी, आई-वडील आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून आम्ही एक ग्रोथ, समजदारी आणि सहजीवनाचा प्रवास केला होता.
आज आम्ही जीवनाच्या अशा टप्प्यावर उभे आहोत, जिथून आमचे मार्ग वेगवेगळे होत आहेत. ऐश्वर्या आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊन स्वत:चा शोध घेऊ. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या प्रायव्हसीची कदर करून आम्हाला त्याच्याशी डील करू द्या, अशी भावूक पोस्ट धनुषने लिहिली आहे.
ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. धनुष आणि ऐश्वयार्चा 2004मध्ये विवाह झाला होता. त्यांना यात्रा आणि लिंगा नावाची दोन मुले आहेत. मध्यंतरीही हे दोघे विभक्त होण्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, या दोघांनीही मीडियाशी कधीच संवाद साधून या बातम्यांचं खंडन केलं नव्हते.
धनुष हा प्रसिद्ध निर्माते कस्तुरी राजा यांचा मुलगा आहे. धनुष अभिनेता तर आहेच. शिवाय दिग्दर्शक, निमार्ता, डान्सर, पार्श्वगायक, गीतकार आणि संवाद लेखकही आहे.एका सिनेमाच्या दरम्यान धनुष आणि ऐश्वयार्ची भेट झाली होती. सिनेमाच्या निर्मात्याने ऐश्वयार्ची धनुष सोबत ओळख करून दिली.
ऐश्वयार्ने या सिनेमातील कामाबद्दल धनुषचं कौतुक केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनुषने ऐश्वयार्ला फुलांचा गुच्छ पाठवला. ऐश्वयार्ला धनुषची ही भेट प्रचंड आवडली आणि त्यानंतर दोघं चांगले मित्रं बनले. दोघेही जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा तेव्हा ते फोटोग्राफर्सच्या नजरेतून सुटत नसायचे. त्यामुळे दोघांचे फोटो वारंवार छापून यायचे. मीडियात दोघेही बातमीचा विषय बनून गेले होते.
मात्र, आपल्या नातेसंबंधावर धनुषने कधीच उघडपणे भाष्य केलं नव्हतं. ऐश्वर्या आपल्या बहिणीची मैत्रीण आहे असंच ते सांगायचे. मात्र, कालांतराने दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघांच्या लव्ह स्टोरीची अधिकृत माहिती समोर आली. 18 नोव्हेंबर 2004 रोजी दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला अख्खी साऊथची फिल्म इंडस्ट्री हजर होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App