गणेशवारी कोकणची, साथ भाजप + शिंदे, मनसेची!!; पण यात ठाकरे – पवार – काँग्रेस कुठेयत??

विनायक ढेरे

नाशिक : कोरोनाच्या दोन वर्षांच्या त्रासानंतर यंदा २०२२ मध्ये खरंच गणेशोत्सव अतिशय जल्लोषात सुरू होतो आहे. त्यातही कोकणामध्ये या जल्लोषाला दर्यासारखे उधाण आले आहे. या दर्याच्या उधाणात आपले राजकीय हात धुवून घेण्यासाठी खरं म्हणजे सगळेच पक्ष आघाडीवर असायला हवेत, पण सध्या आघाडीवर दिसताहेत ते फक्त भाजप + शिवसेनेचा शिंदे गट आणि मनसे!! यामध्ये ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस कुठेच दिसत नाहीत. Ganeshwari of Konkan, with BJP + Shinde, of MNS

मोदी एक्सप्रेस आणि बस गाड्या

मुंबई आणि पुण्यातील चाकरमान्यांसाठी गणेशोत्सवात कोकणवारी घडवण्यासाठी भाजप + शिंदे गट आणि मनसे यांनी आपापल्या पद्धतीने रेल्वे बस गाड्यांचा व्यवस्था केली आहे. त्याचा शुभारंभ देखील दोन दिवसांपूर्वी पासून वेगवेगळ्या ठिकाणी झालेला दिसला आहे. मुंबई, ठाणे, पुणे पट्ट्यातील निवडणुकीची जोरदार तयारी या कोकणाच्या गणेशवारीतूनच सुरू झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.



भाजपने मोदी एक्सप्रेस कालच दादर स्थानकावरून रवाना केली आहे. मुंबई परिसरात भाजपने 300 बस गाड्यांची व्यवस्था करून गणेश भक्तांना मोफत कोकणात पोहोचवण्याची सोय केली आहे, तर मनसेने तब्बल 136 गाड्या बुक केल्या आहेत. त्यातल्या काही गाड्या रवाना देखील झाल्या आहेत. जे भाजप आणि मनसेचे तेच एकनाथ शिंदे गटाचे. एकनाथ शिंदे गटाने ठाण्यातून आणि मुंबईतून अशाच अनेक बस गाड्या बुक करून गणेशभक्तांची कोकणवारीची सोय केली आहे.

 ठाकरे गटाचे अस्तित्व नगण्य

पण या सगळ्या राजकीय गणेश वाऱ्यांमध्ये शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मात्र कुठेच दिसत नाहीत. एरवी शिवसेना अखंड असती, तर शिवसेनेच्या एकट्याचाच 500 हून अधिक गाड्या कोकणात आपला भगवा फडकत रस्त्यावरून जाताना दिसले असत्या. आता प्रत्येक गाड्यांवर वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे फडकतच आहेत, पण शिवसेनेच्या ठाकरे गटाचा झेंडा कुठे दिसत नाही. ठाकरे गट आधीच राजकीयदृष्ट्या धास्तावलेला आणि त्यामुळे सुस्तावलेला दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या पत्रकार परिषदा, त्यांची संभाजी ब्रिगेडशी झालेली युती, आदित्य ठाकरे यांचा झालेला प्रामुख्याने मुंबई आणि नंतर छोटा महाराष्ट्र दौरा हे वगळता शिवसेना अजून सुस्तावलेपणातून बाहेर आलेली दिसत नाही. न्यायालयीन लढाईत नेमके काय होणार?, याची धास्ती शिवसेनेच्या दोन्ही गटांना आहे. पण शिंदे गट मात्र राजकीय दृष्ट्या ठाकरे गटापेक्षा कितीतरी पटीने “पॉलिटिकली ऍक्टिव्ह” आहे.

 शिंदे गटाची ठाकरे गटावर आघाडी

गणेशोत्सवाच्या निमित्ताने निवडणूक तयारी करताना या गटानेच आघाडी घेतली आहे. दहीहंडीच्या दिवशी देखील हेच चित्र दिसले आहे. ठाकरे गटाच्या एक दोन मोठ्या दहीहंड्या वगळल्या, तर शिंदे गटाचे दहीहंडीवर वर्चस्व दिसले. त्या खालोखाल मनसेची दहीहंडी गाजली. या सगळ्यात शिवसेनेचा ठाकरे गट मात्र फार म्हणजे फारच कमी पडताना दिसतो आहे. ठाकरे गटाची तयारी ना मुंबईत सुरू आहे, ना कोकणात, ना बाकीच्या महाराष्ट्रात!!

 राष्ट्रवादीची “अल्पसंख्यांक” तयारी

याउलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आपापल्या बालेकिल्ल्यांमध्ये तयारी दिसत आहे. पण त्याचा ना गणेशोत्सवाशी संबंध आहे, ना दहीहंडीशी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर असताना जितेंद्र आव्हाड दहीहंडी आयोजनात आघाडीवर असायचे. पण यंदा त्यांची आघाडी कुठेच दिसली नाही. तसेही हिंदू सणांच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तोंडी अथवा ट्विटरवर शुभेच्छा देण्याकरिता फारसे काही करताना दिसत नाहीत.

रमजानच्या वेळी मात्र त्यांच्या अध्यक्षांपासून तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत अनेक जण इफ्तार पार्ट्यांचे उत्साही आयोजन करताना दिसतात. शरद पवारांनी चारच दिवसांपूर्वी दिल्लीत अल्पसंख्यांक मेळावा घेतला. हा फरक दोन्ही पक्षांच्या आणि हिंदुत्ववादी पक्षांच्या नैसर्गिक विचारसरणीचा आहे. धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्याखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी उघडपणे मुस्लिमांना आवडेल याच पद्धतीने राजकीय कार्यक्रम राबवतात. त्याउलट हिंदुत्ववादी पक्ष धडाक्याने हिंदू सण साजरे करतात याची खरं म्हणजे प्रथा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अखंड शिवसेनेने सुरू केली. धडाक्याने राबवून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवली. पण 2022 च्या दहीहंडी आणि गणेशोत्सवात मात्र दुर्दैवाने शिवसेनेचा ठाकरे गट पूर्णपणे मागे पडल्याचे दिसत आहे.

 भाजपच्या 300 गाड्या

भाजपने मुंबईतील विविध भागातून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जाणाऱ्या 300+ मोफत बस सेवेचा, परळ येथे शुभारंभ केला. यावेळी पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा जी उपस्थित होते. कोकणात जाणाऱ्या भाविकांनी आपल्या गावी सुरक्षित पोहोचावे, आणि सहपरिवार, गणेशोत्सव आनंदात साजरा करावा, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

Ganeshwari of Konkan, with BJP + Shinde, of MNS

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात