प्रतिनिधी
मुंबई : गणेशाच्या आगमनात पावसाचे विघ्न नाही अशी सुखद वार्ता हवामान विभागाने दिली आहे. आठवड्याभरापासून विश्रांतीवर असलेल्या वरुणराजाची बुधवारी गणपतीच्या आगमनाच्या दिवशी हलक्या सरींसह हजेरी राहील. पण त्याचे मिरवणुकांना विघ्न असणार नाही. त्यामुळे गणेशभक्तांना सुखनैव गणपती आगमनाच्या मिरवणुका काढता येतील.Rain does not hinder Ganesha’s arrival; Take out happy processions
दोन दिवसांपासून अधिक काळ मुंबईत मुसळधार पाऊस झाला नसल्याने सध्या तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिपर्यंत नोंदवले जात आहे. बुधवारी मात्र कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. गणरायाच्या आगमनानंतर शुक्रवारपासून मुंबईत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने सात दिवसांच्या अंदाजपत्रात वर्तवला आहे.
कडाक्याचे ऊन, घामाच्या धारा आणि पावसाची गैरहजेरी असे मुंबईत गेल्या आठवड्याभरापासून वातावरण आहे. बुधवारी कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यास ऑगस्ट महिन्यातील गेल्या दहा वर्षांतील कमाल तापमानाच्या तुलनेत बुधवारचे कमाल तापमान दोन अंशाने जास्त असेल. अगोदरच पावसाच्या गैरहजेरीत मुंबईतील दोन्ही वेधशाळा केंद्रात आर्द्रतेचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. रविवारी कुलाब्यात आर्द्रतेचे प्रमाण ८९ टक्के तर सांताक्रूझ केंद्रात ८४ टक्क्यांपर्यंत आर्द्रतेचे प्रमाण पोहोचले.
दोन्ही केंद्रात कमाल तापमानाची नोंद ३१.४ अंश सेल्सिअसपर्यंत झाली. तर किमान तापमान कुलाबा केंद्रात २५.५ तर सांताक्रुझ केंद्रात २४.६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. सोमवारपासून कमाल तापमानात एका अंशाने घट होईल तर मंगळवारपासून किमान तापमान २६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, असा दोन दिवसांच्या अंदाजपत्रात मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App