काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडावर प्रश्न विचारले; फारूक अब्दुल्ला इंटरव्यूमध्ये चिडून निघून गेले!!


प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू कश्मीर मध्ये 1989 1990 च्या दरम्यान झालेल्या हिंद हिंदू हत्याकांडावर टाइम्स नाऊ नवभारत वृत्तवाहिनीवर पत्रकार नाविका कुमार यांनी प्रश्न विचारले. त्या प्रश्नांना सामोरे जाऊन थेट उत्तरे देण्याऐवजी त्या वेळचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला इंटरव्यू सोडून निघून गेले!! Asked about the massacre of Kashmiri Hindus

नाविका कुमार यांनी आपल्या “फ्रँकली स्पिकिंग” शोमध्ये डॉक्टर अब्दुल्ला यांचा काश्मीर मधल्या हिंदू हत्याकांडावर प्रश्न विचारून इंटरव्यू घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अब्दुल्लांचे पहिल्यापासूनच तेवर इंटरव्यू विरोधात होते. काश्मीरमधील दहशतवादाच्या कालखंडात काश्मिरी हिंदू आणि मुसलमान दोन्ही मारले गेले. त्यावर प्रश्न विचारा. फक्त एकाच बाजूने प्रश्न विचारू नका, असा आग्रह डॉ. अब्दुल्लांनी धरला. मात्र 1989 मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात सलग जे हिंदू हत्याकांड घडले, त्यावेळी ते मुख्यमंत्री पदावर होते. या संदर्भात नाविका कुमार यांनी प्रश्न विचारला.

टीकालाल टपलू, जस्टीस नीलकंठ गंजू आणि पत्रकार प्रेमनाथ भट यांची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. तेव्हा आपण काय केलेत??, आपण मुख्यमंत्री होतात!!, हा प्रश्न विचारताच डॉक्टर फारूक अब्दुल्ला चिडले. तुम्ही भाजपच्या पत्रकार आहात, असा आरोप करून कॉलर माईक काढून इंटरव्यू मधून निघून गेले. काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडावर एकाही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले नाही.

बाकी हिंदू मुसलमान काश्मीरमध्ये एकत्र वाढले आहेत काश्मिरी हिंदूंना परत काश्मीर घाटीत आणायला आमचा विरोध नाही वगैरे वक्तव्य त्यांनी अधून मधून केली. पण काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडावर नेमका प्रश्न विचारल्यानंतर मात्र ते चिडून निघून गेले

Asked about the massacre of Kashmiri Hindus

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात