सपकाळ यांच्या पार्थिवावर दुपारी 12 वाजून 10 मिनीटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल येथे महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार दफणविधी केला जाईल.Funeral will be held at 12 noon on Sindhutai Sapkaal Parthiva
विशेष प्रतिनिधी
पुणे : ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ याचे मंगळवारी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 75 व्या निधन झाले.पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने महाराष्ट्रवर शोककळा पसरली.सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्याआधी बाल सदन संस्थेत त्यांचे पार्थिव दोन तासांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सपकाळ यांच्या पार्थिवावर दुपारी 12 वाजून 10 मिनीटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल येथे महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार दफणविधी केला जाईल.
त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अनाथ मुलांना वाढवलं. त्यांना आईची माया दिली. मात्र त्यांचे निधन झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App