उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावत केलं स्पष्ट Free electricity to farmers is not an election slogan, but there is an exact plan behind it Devendra Fadnavis clarified
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषि फिडर योजनेत 95 टक्के सरकारी जागा मिळाली आहे. त्यामुळे जागा पूर्णतः उपलब्ध झाली आहे. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
याशिवाय ’18 महिन्यात 9000 मे.वॉट सौर फिडर हे सौर उर्जेवर जाणार आहेत. यासाठी 2.81 ते 3.10 रुपये असा दर आला आहे. सध्याचा 7 रुपये असा असलेला दर, त्यामुळे 4 रुपयाची बचत होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज ही निवडणूक घोषणा नाही, तर त्यामागे नेमके नियोजन आहे.’ असंही फडणवीस म्हणाले.
तसेच, ‘9.5 लाख सौर कृषिपंप लक्षांक आपल्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे मागेल त्याला सौर कृषि पंप देण्यात येणार आहेत.अनुसूचित जाती आणि जमाती यांना केवळ 5 टक्के टक्के हिस्सा द्यायचा आहे. यात एकूण 5 कंपन्यांना काम देण्यात आले. स्पर्धात्मक निविदात 8 कंपन्या आल्या, त्यामुळे केवळ विशिष्ट लोकांना लाभ होईल, हा आरोप खोटा आहे. हे स्मार्ट मीटर केवळ सरकारी कार्यालय आणि महावितरण आस्थापनांना लावण्यात येणार आहेत. यासाठी अतिरिक्त खर्च येणार नाही, तर वीज बचतीचा पैसा वापरण्यात येणार आहे. अशी माहितीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
याचबरोबर ‘चुकीच्या गोष्टी सांगून तुम्ही जिंकलात, पण स्मार्ट मीटरची योजना तयार कुणी तयार केली तर ती महाविकास आघाडी सरकारने. आम्ही सामान्य नागरिकांना स्मार्ट मीटर बसविणार नाही.’ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App