भाजपने काँग्रेसला लगावला नेमका टोला?, विजय वडेट्टीवारांना धरंल धारेवर, जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे?
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘मुंबईतील जमिनी अदानीच्या घशात घातल्या जात आहे. दुग्धव विकास विभागाची साडेआठ हजार हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली आहे.’ असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यावर केला आहे. ज्याला आता भाजपने सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. अदानीचे शेअर्स विकत घेऊन जगणाऱ्या काँग्रेसने आम्हाला अदानी बद्दल विचारू नये. विजय वडेट्टीवार अदानी बद्दल बोलताना तुमचे मालक रॉबर्ट वाड्रा यांची परवानगी घेतली का…? बऱ्याच प्रकल्पात काँग्रेसचे जावई अदानी सोबत पार्टनर म्हणून दिसतात.. याच उत्तर आहे का विजय वडेट्टीवार.? असे प्रश्न करत महाराष्ट्र भाजपने काँग्रेसला टोले लगावले आहे.
भाजपने म्हटलं आहे की, ‘बालबुद्धी राहुल गांधींचे महाराष्ट्रातील गुलाम विजय वडेट्टीवार यांनी सांगावं मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील ( भारत नगर ) जमीन आणि झोपड्या जमीनदोस्त करून 2005 – 6 मध्ये अदानी समुहाला दिली ती कोणाच्या माध्यमातून दिली? 2005 – 6 ला कुणाचे सरकार राज्यात आणि केंद्रात होते? राहुल गांधी यांचे जिजा, प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि उद्योगपती अदानी यांच्यात कोणते संबंध आहेत? ते कोणत्या प्रकल्पावर काम करत आहेत?’
याशिवाय ‘ममता बॅनर्जी आणि उद्योगपती अदानी एकमेकांना का भेटले?, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, गौतम अदानी सोबत काय करत आहेत?, शरद पवारांचे आणि उद्योगपती अदानी यांचे काय संबंध आहेत? का वारंवार गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला जातात? शरद पवारांच्या काही संस्थाना अदानीकडून किती देणगी दिली जाते? 2013 मध्ये महाराष्ट्रातील तिरोडा येथील 660 मेगावॅटचा थर्मल पावर प्लांट तत्कालीन काँग्रेस सरकारने अदानीला का दिला?’ अशी प्रश्नांची सरबत्ती भाजपकडून करण्यात आली आहे.
याचबरोबर ‘अदानी समूहाला 2014 पूर्वी काँग्रेस सरकारकडून कोणकोणते पुरस्कार दिले आहेत, हे जनतेला कळलं पाहिजे. काँग्रेसच्या मनमोहनसिंग सरकारने आदणीला समुहाला ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं होतं. 2010-11 साठी मनमोहनसिंग सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाकडून औष्णिक ऊर्जा प्रकल्प – युनिट-1 त्वरित पूर्ण केल्याबद्दल गोल्ड शील्ड पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2013, ऊर्जा मंत्रालय, मनमोहनसिंग सरकारकडून देण्यात आला. 2013 मध्ये याच काँग्रेसच्या कर्नाटकमधील सिद्धरमैय्या सरकारने सर्वश्रेष्ठ सुरक्षित पॉवर बॉयलर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. असे अनेक पुरस्कार याच काँग्रेसने अदानी समूहाला दिलेले आहेत.’ असंही भाजपने म्हटलं आहे.
तसेच, ‘अदानी तुमचा अदानीला मोठं काँग्रेसने केलं, विश्वासहार्यता चांगली दाखवण्यासाठी अनेक पुरस्कार देऊन गौरव केला. आज ती काँग्रेस भाजपला कोणत्या तोंडाने प्रश्न विचारते?’ असा नेमका सवालही भाजपने केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App