चंपाई सोरेन यांनी काल राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला होता
विशेष प्रतिनिधी
रांची: हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. गुरुवारी त्यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली. बुधवारी झालेल्या इंडी आघाडीच्या बैठकीनंतर चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. हेमंत सोरेन यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली असून, 31 जानेवारी रोजी केंद्रीय तपास यंत्रणेने अटक केल्यानंतर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर चंपाई सोरेन झारखंडच्या मुख्यमंत्री बनले होते.Hemant Soren took oath as the Chief Minister of Jharkhand on his third day
झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी राजभवनात हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. जेएमएमने आदल्या दिवशी सांगितले होते, की राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी हेमंत सोरेन यांना राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले आहे आणि ते 7 जुलै रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
झामुमोच्या नेतृत्वाखालील आघाडीने नंतर निर्णय घेतला की हेमंत सोरेन आज (गुरुवारी) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. चंपाई सोरेन यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात जामिनावर सुटलेले हेमंत सोरेन यांनी सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता.
हेमंत सोरेन 2013 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. यानंतर, 2019 मध्ये, JMM-काँग्रेस-RJD आघाडीने हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आणि ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. हेमंत सोरेन हे झारखंडमध्ये तीनदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे तिसरे नेते असतील. याआधी त्यांचे वडील शिबू सोरेन आणि भाजपचे अर्जुन मुंडा यांनी प्रत्येकी तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App