जालन्यातले लाठीचार्जचे आदेश फडणवीसांचे नव्हते; माहिती अधिकारात सत्य समोर


प्रतिनिधी

मुंबई : अंतरवली सराटी येथे पोलिस कर्मचारी आणि मराठा आंदोलकांवर झालेल्या या लाठीहल्ला प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जचा आदेश दिल्याचा आरोप काहीजणांनी केला होता. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्दोष असल्याचे सत्य माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. Fadnavis did not order the baton charge in Jalana

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समूदायाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात अंतरवली सराटी येथे आंदोलन सुरु होते. यावेळी आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमुळे राज्यभरातून संतापाची लाट निर्माण झाली. लाठीचार्जचा आदेश देणारे पोलिस आणि सरकारमधील मंत्री यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरली होती. त्यानंतर सरकारकडून काही पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.


परत येणारा तर व्हिडिओ टाकून येतो का??; देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांनाच टोला!!


फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नव्हते

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्जचे आदेश दिले नव्हते, असे माहिती अधिकारातून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी आरटीआय अर्ज केला होता. त्यानंतर आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश मिळाले नव्हते, अशी माहिती जालन्याचे पोलीस उपअधीक्षक आर. सी. शेख यांनी दिली आहे.

मागितली होती माफी

मराठा आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यानंतर टीका होऊ लागल्याने त्यांनी याप्रकरणी माफी मागितली होती. लाठीचार्ज व्हायला नको होता, असं ते म्हणाले होते. लाठीचार्जचा निर्णय पोलिसांनी त्यावेळची परिस्थिती पाहून घेतला होता, असे फडणवीस म्हणाले होते.

Fadnavis did not order the baton charge in Jalana

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात