Fadanavis Pendrive Bomb : पवारांच्या “कौतुका”नंतर फडणवीसांची प्रतिक्रिया, अजून खोलात गेलेलो नाही… पण…!!

प्रतिनिधी

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांविरोधात पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडल्यानंतर अपेक्षेप्रमाणे शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी त्यातील आरोपांचा इन्कार केला आहे. मात्र शरद पवारांनी 125 तासांच्या रेकॉर्डिंगचे कौतुक करत देवेंद्र फडणवीस यांची खोचकपणे पाठ थोपटली आहे…!!Fadanavis Pendrive Bomb

पवारांच्या या “कौतुका”नंतर फडणवीस यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करून पलटवार केला आहे… अजून आम्ही खोलात गेलेलो नाही. पण आमच्या विरोधात रचलेले कुभांड पाहता खोलात जाऊन योग्य ठिकाणी प्रत्युत्तर देऊ, असे फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये पेन ड्राईव्ह सादर करून तब्बल 125 तासांचे व्हिडिओ फुटेजदेखील सादर देखील केले होते. यावर बुधवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन 125 तासांची रेकॉर्डींग ही संशयास्पद असल्याचा आरोप केला होता. त्याची सत्यता पडताळून पाहायला हवी, असे ते म्हणाले. यावर फडणवीसांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेवर देवेंद्र फडणवीसांना काही प्रश्न विचारले असता ते म्हणाले, आम्ही अजून खोलात गेलेलो नाही. पण भाजप नेत्यांविरोधात ज्या प्रकारचा कट रचला आहे, तो आमच्यासाठी खोलात जाण्यासारखा विषय आहे. आम्ही योग्य पद्धतीने पाठपुरावा करू.


फडणवीसांच्या “पेनड्राइव्ह बॉम्ब”मध्ये आहे तरी काय…??; बडे साब, मोठे साहेब!!; कसे रचले कारस्थान…??


काय म्हणाले पवार?

देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये पेन ड्राईव्ह सादर करून तब्बल 125 तासांचं व्हिडिओ फुटेजदेखील विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले. त्या रेकॉर्डिंगसाठी पवारांनी फडणवीसांचं कौतुक केले. त्या रेकॉर्डींगसाठी शक्तीशाली यंत्रणा कामाला लागल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा यंत्रणा फक्त केंद्र सरकारकडे आहेत त्यामुळे त्यांचा वापर झाला असावा, अशी शक्यता पवारांनी व्यक्त केली. या प्रकरणी फडणवीसांनी माझं नाव देखील घेतलं. पण यात माझा काही संबंध नाही. मला देखील त्यांच्या आरोपांचा काही भाग समजला नाही, आरोपांच्या खोलात मी अद्याप गेलो नाही, पण भाजप सत्तेचा गैरवापर होत असून अशा कारवाया करत असल्याचा आरोप पवारांनी केला.

राज्य सरकारवर देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप केले होते. त्याचे पुरावे असल्याचे सांगत त्यांनी विशेष सरकारी वकील प्रवीण पंडीत चव्हाण यांचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले. त्याबाबत पुरावे असून 125 तासांचं रेकॉर्डींग केल्याचे फडणवीसांनी सांगितलं. हे रेकॉर्डींग देखील फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केले. गिरीश महाजन यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना कसे फसवण्यात आले? याबाबतच सर्व रेकॉर्डींग त्यात असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते.

Fadanavis Pendrive Bomb

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात