विशेष प्रतिनिधी
सांगली : प्रत्येक वेळी बिळात जाऊन बसता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तुमच्यात वाघाचे एक गुणही नाहीत. आम्ही खरा वाघ बघण्यासाठी अधिवेशनात येणार आहोत, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे.Every time you go and sit in the bin, you don’t have any of the qualities of a tiger, Sadabhau Khot criticizes Uddhav Thackeray,
सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे एका सभेत बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता तरी जरा आपल्या महालातून बाहेर या आणि जनतेचे प्रश्न काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कोरोना आला, मास्क लावा, घरात बसा आणि पळ काढा. याला वाघ म्हणत नाहीत. तर वाघ हा डरकाळ्या फोडत जात असतो.
तुमच्यात वाघाचे एकही लक्षण नाही. प्रत्येकवेळी बिळात जाऊन बसता. आम्ही खरा वाघ पाहायला अधिवेशनात येणार आहेत.शेतकरी, शेतमजूर आणि बारा बलुतेदार यांचे अनेक प्रश्न राज्यात आहेत. त्यामुळे हे अधिवेशन पूर्णवेळ झाले पाहिजे. पण हे सरकार अधिवेशनातून सातत्याने पळ काढत आहेत.
संसदेचे अधिवेशन महिनाभर चालते आणि राज्याचे अधिवेशन पाच दिवसातच गुंडाळून घेण्यात येतो. यांना भीती वाटते की यांचा भ्रष्टाचार बाहेर पडेल. अनेकांना मंत्रिमंडळातून बाहेर जावे लागेल. या भीतीपोटी ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन घेत नाही, असा आरोप खोत यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App