प्रतिनिधी
मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. हे ट्विट सूचक असल्याची मखलाशी माध्यमांनी केली आहे. पण या ट्विटमध्ये सूचक वगैरे काही नाही ते सरळ ट्विट आहे फक्त बाळासाहेब दिघे आणि हिंदुत्व!!, यापेक्षा दुसरे काहीही नाही हे एकनाथ शिंदे यांनी स्वच्छपणे म्हटले आहे.Eknath Shinde: Not a pointer for Gurupourni, a straightforward tweet; Only Balasaheb, Dighe and Hindutva
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच, अस म्हणत त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना अभिवादन केले. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर, त्यांना शिवसेनेतील 40 आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात यश आले आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या टीव्हीमधून उद्धव ठाकरेंना वगळल्याचे माध्यमांनी नमूद केले आहे पण एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना कधी गुरु म्हटले होते याचा उल्लेख माध्यमांनी केलेला नाही उलट एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतल्या भाषणामध्ये ठळकपणे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचेच नाव घेतले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे हे ट्विट सूचक वगैरे काही नसून ते सरळ आणि थेट आहे.
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही…. गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…#गुरुपौर्णिमा pic.twitter.com/NKYUBOYQXk — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच.
विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही….
गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…#गुरुपौर्णिमा pic.twitter.com/NKYUBOYQXk
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022
असे आहे ट्विट
“बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही,” असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ट्विटसोबत एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचाही फोटो छापला आहे.
स्मृतिस्थळ आणि आनंदाश्रमात अभिवादन
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घेतले तसेच, ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात जाऊनही त्यांनी अभिवादन केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App