जयललितांचा वारसा : तामिळनाडूत इडापड्डी पलानीस्वामी बनले “एकनाथ शिंदे”!!

तामिळनाडूच्या राजकारणात जयललितांचा वारसा या मुद्द्यावरून नवा ट्विस्ट आला आहे. माजी मुख्यमंत्री इडापड्डी पलानीस्वामी हे अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम सरचिटणीस बनले आहेत. अण्णा द्रमुकाच्या कौन्सिल मध्ये त्यांच्यासह 60 आमदार निवडले गेले आहेत. तामिळनाडू विधानसभेत अण्णा द्रमुकचे 63 आमदार आहेत. त्यापैकी 60 आमदार पलानीस्वामी यांच्या बाजूने आहेत, तर 3 आमदार माजी उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या बाजूने उरले आहेत.Jayalalithaa’s legacy: Idapaddy Palaniswami becomes “Eknath Shinde” in Tamil Nadu !!

चेन्नईमध्ये अण्णा द्रमुक कार्यालयासमोर पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. खुर्च्यांची फेकाफेक, दरवाजे तोडणे, एकमेकांच्या फोटोंना चपलांनी मारणे असे प्रकार घडले आहेत.



जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुख पक्षावर नेमका कब्जा कोणाचा याचा हा वाद आहे आणि त्यातूनच इडापड्डी पलानीस्वामी आणि ओ. पनीरसेल्वम यांच्यातला वाद उफाळला आहे. तामिळनाडूत अण्णाद्रमुकची सत्ता असताना पलानीस्वामी मुख्यमंत्री होते. तर ओ पनीरसेल्वम हे उपमुख्यमंत्री होते. या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन तामिळनाडूची सत्ता चालवली आणि जयललिता यांच्या मैत्रीण शशिकला यांना बाजूला सारले. शशिकला यांना बाजूला सारण्यासाठी एकत्र राहिलेले हे दोन्ही नेते सत्ता गेल्यावर आता मात्र अण्णाद्रमुक पक्षावर ताबा मिळवण्यासाठी एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.

– सरचिटणीसाला महत्त्व

अण्णा द्रमुकच्या पक्षीय रचनेमध्ये सरचिटणीसाला महत्त्व असते. स्वतः एम. जी. रामचंद्र हे सरचिटणीस होते. त्यानंतर जयललिता सरचिटणीस झाल्या. जयललिता यांच्यानंतर सरचिटणीस पद बरखास्त करण्यात आले आणि पलानीस्वामी यांना समन्वयक नेमण्यात आले, तर ओ. पनीरसेल्वम यांना सहसमन्वयक नेमले. पण आता पक्षाच्या घटनेत बदल करून पुन्हा एकदा सरचिटणीस पद प्रस्थापित करण्यात आले असून त्यावर दोन्ही नेत्यांनी दावा सांगितला आहे.

तामिळनाडूचे “एकनाथ शिंदे”

परंतु पलानीस्वामी यांनी तामिळनाडू विधानसभेतल्या 63 पैकी 60 आमदारांना आपल्याकडे वळवले. त्यांना अण्णाद्रमुख कौन्सिलचे सदस्य पद बहाल केले आणि या सर्वांनी मिळून पलानीस्वामी यांना सरचिटणीस नेमले. इथेच ते तामिळनाडूतले “एकनाथ शिंदे” ठरले. एकनाथ शिंदे यांनी जसे महाराष्ट्रात शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आपल्या बाजूने वळवून घेतले तसेच तामिळनाडूत पलानी स्वामी यांनी 60 पैकी 63 आमदार आपल्या बाजूने वळवले.

– पक्ष मुख्यालयावर पनीरसेल्वम यांचा दावा

मात्र, त्याचवेळी पक्षाच्या मुख्य कार्यालयावर ओ. पनीरसेल्वम यांच्या कार्यकर्त्यांनी आधीच ताबा घेतला. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये कार्यालयात आणि कार्यालयाबाहेर तुफान धुमश्चक्री झाली. प्रकरण कोर्टात गेले होते. परंतु मद्रास हायकोर्टाने या प्रकरणात लक्ष घालायला नकार दिला. आजच्या बैठकीला स्थगिती द्यायलाही नकार दिला. त्यामुळे पनीरसेल्वम गटाला झटका बसला. परंतु त्यांनी अण्णाद्रमुक पक्ष कार्यालयाचे दरवाजे तोडून आत मध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर पलानीस्वामी गट आणि पनीरसेल्वम गट यांच्यामध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. आता याचा अंतिम निकाल काय लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण त्यातूनच जयललितांचा खरा राजकीय वारस कोण?, हे सिद्ध होणार आहे.

Jayalalithaa’s legacy: Idapaddy Palaniswami becomes “Eknath Shinde” in Tamil Nadu !!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात