शिंदे फडणवीस सरकारचे उद्या ठरणार भवितव्य; पण सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होणार??


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचे 40 आमदार बाहेर पडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेली सरकार टिकणार की अन्य काही होणार?, या विषयावर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी होऊन निर्णय होणे अपेक्षित आहे. Tomorrow will be the future of the Shinde Fadnavis government

उद्या सोमवारी होणाऱ्या सुनावणीत ठाकरे गटाचे १६ बंडखोर आमदार पात्र राहणार की अपात्र होणार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्त मान्य केली, हा निर्णय योग्य होता की अयोग्य?, याचा निवडा होणार आहे. या दोन्ही प्रकरणावरील निर्णयामुळे शिंदे सरकारचे भवितव्य निश्चित होणारच आहे, तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचेही भवितव्य स्पष्ट होणार आहे.

पण मूळात उद्या सुप्रीम कोर्टात सोनवणे होणार का नाही याविषयी शंका निर्माण झाली आहे. कारण उद्या कोर्टाच्या सुनावणीच्या यादीत महाराष्ट्राचा विषय नसल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत.



 

– तर शिंदे सरकारही कोसळेल 

एकनाथ शिंदे सुरुवातीला शिवसेनेचे २९ आमदार घेऊन महाराष्ट्राबाहेर पडले, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवून अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यानंतर शिंदे गटाला शिवसेनेचे एकेक करत आता ४० आमदार जाऊन मिळाले आहेत. मात्र त्या दरम्यान शिवसेनेने पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले म्हणून १६ आमदारांना अपात्र करण्याची मागणी उपाध्यक्ष झिरवळ यांना केली, त्यानुसार झिरवळ यांनी त्या आमदारांना नोटीस पाठवली. त्यामुळे शिंदे गटाने उपाध्यक्षांच्या १६ आमदारांच्या विरोधातील बजावलेली नोटीस आणि शिंदे यांना गटनेते पदावरून हटवण्याचा निर्णय या दोन्ही निर्णयांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने ११ जुलै रोजी सुनावणी स्थगित केली. तरीही एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांनी बहुमत चाचणी केली. तत्पूर्वी शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, परंतु मंत्रिमंडळ विस्तार केला नाही.

– दोन्ही बाजूंना धाकधूक

कारण नव्या सरकारलाही सोमवारी न्यायालयात काय निर्णय होतो त्याची धाकधुक आहे. जर न्यायालयाने १६ आमदारांना अपात्र ठरवले, तसेच अजय चौधरी यांची गटनेते पदावरील नियुक्ती ग्राह्य धरली, तर बहुमत चाचणीच्या वेळी उद्धव ठाकरे यांचा व्हीप मान्य होईल आणि सरकारला धोका निर्माण होईल. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. तसेच राज्यात मध्यावधी निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नजर खिळलेल्या आहेत.

कोण काय म्हणाले?  

सुप्रीम कोर्टाच्या महत्त्वाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेमध्ये देश आहे. उद्या कळेल या देशात लोकशाही आणि न्यायव्यवस्था योग्य आहे की नाही. या निकालाकडे देशाचे लक्ष लागले. आमचा न्याय देवेतेवर पूर्ण विश्वास आहे. किती दबावाखाली न्याय व्यवस्थेचे काम चालू आहे, हे आम्हाला माहिती आहे. परंतु देशाला हे समजेल की, या देशाची न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे. आम्हाला उद्या न्याय मिळेल, असे अपेक्षित आहे : संजय राऊत, शिवसेना नेते.

…आमदारांच्या अपात्रतेबद्दल सुप्रीम कोर्टात उद्याचा निर्णय घटनेनुसार आणि कायद्याला धरून असणे अपेक्षित आहे. उद्याच्या निकालावर महाराष्ट्र सह देशाचे लक्ष आहे. म्हणूनच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबविला आहे. उद्याचा निर्णय सरकारच्या विरोधात गेला तर, पुन्हा एकदा महाराष्ट्रात भूकंप घडेल. कोर्ट काय निकाल देईल हे आता सांगता येत नाही : विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते.

ज्यांना परत यायचे आहे त्यांच्याकरता मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. जे पळून गेलेत त्यांच्यातही दोन गट आहेत. काही बंडखोर आमदारांच्या राक्षसी महत्वाकांक्षा आहेत. मात्र काही आमदारांना जबरदस्ती नेले होते. थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा : आदित्य ठाकरे, शिवसेना नेते.

Tomorrow will be the future of the Shinde Fadnavis government

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात