गोव्यात भाजप करतोय काँग्रेसचा “शिंदे पॅटर्न”; दिगंबर कामत ठरताहेत “एकनाथ शिंदे”!!


प्रतिनिधी

पणजी : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन आठवड्यांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडविल्यानंतर भाजप आता गोव्यात काँग्रेस “शिंदे पॅटर्न” करण्याच्या बेतात आहे. गोव्यातल्या फुटीर काँग्रेस आमदारांच्या गटाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत करत असल्याची बातमी आहे. Congress in trouble in goa, 10 MLAs will defect to BJP under leadership of digambar kamat

शिवसेना आणि अपक्ष अशा ५० आमदारांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपने बहुमत सिद्ध करून राज्यात सरकार स्थापन केलं. आता महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे 11 पैकी 10 आमदार भाजपात विधिमंडळ गटात विलीनीकरण करण्याच्या तयारीत असल्याचं समोर येत आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे.


पहिल्या झटक्यात आश्वासन पूर्ती : गोव्यात डाॅ. प्रमोद सावंत सरकार देणार वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत!!


भाजप श्रेष्ठींकडूनही यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गोव्यात दाखल झाल्याची माहिती आहे. 2015 मध्ये त्यांनीच गोव्यात राजकीय ऑपरेशन करून त्यावेळी भाजपची सत्ता आणली होती.

गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून आज सायंकाळपर्यंत 10 आमदारांचा हा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. काल शनिवारी या हालचालींचा सुगावा लागल्यानंतर काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव यांनी तातडीने याची दखल घेतली. त्यांनी आमदारांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांच्यासह अन्य 9 काँग्रेस आमदार असे एकूण दहा जणांचा गट भाजपात विलीन करण्याबाबत ठाम असल्याची माहिती समोर येत आहे.

Congress in trouble in goa, 10 MLAs will defect to BJP under leadership of digambar kamat

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात