प्रतिनिधी
मुंबई : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी अमलबजावणी संचालनालय अर्थात ED ने मंगळवारी छापा घातला. ED चे 10 अधिकारी रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. जोगेश्वरी भूखंड प्रकरणी ही चौकशी सुरु आहे.ED raids MLA Ravindra Waikar’s house
रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. रवींद्र वायकर यांच्याकडे यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात छापे घातले होते. आता पुन्हा रवींद्र वायकर यांना नोटीस दिली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी वाजता छापे पडले.
काय आहे रवींद्र वायकरांवर आरोप?
रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी निवासस्थानी ED चे पथक मंगळवारी पोहचले आहे. मातोश्री स्पोर्टस ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेले क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम केल्याचा आरोपी त्यांच्यावर आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात जमिनीवर बांधकाम केल्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावर आहे. रवींद्र वायकर यांनी मुंबई महापालिकेच्या जागेवर बांधलेल्या हॉटेलची किंमत 500 कोटी असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App