विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात लोकशाही खल्लास झाल्याच्या बाता मारणाऱ्या “इंडी” आघाडीतल्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत आपापल्या वारसदारांना पुढे आणून त्यांच्या राजकीय सोयी लावायचे काम जोरावर सुरू केले आहे. “इंडी” आघाडीतल्या नेत्यांचे घराणेशाही फिक्सिंग सुरू झाले आहे.
तिकडे तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी सनातन धर्माला शिव्या देणारे आपले चिरंजीव उदयनिधी स्टालिन यांना शिक्षा करण्यासाठी करण्याऐवजी लोकसभा निवडणुकीतल्या यशाची बक्षिसी देत उपमुख्यमंत्री पदी बसविले आहे. त्याच वेळी महाराष्ट्राचे शरद पवारांनी आपल्या मुलीची राजकीय डाळ शिजत नाही हे पाहून नातवाला गादीवर बसवायची घाई चालवली आहे.
द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षातल्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना बाजूला करत उदयनिधी स्टालिन यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवून एम. के. स्टालिन यांनी आपला राजकीय वारस “फिक्स” करून टाकला आहे. तोच प्रकार शरद पवारांनी महाराष्ट्रात चालवल्याची चिन्हे दिसायला लागली आहेत.
अहमदनगर मध्ये बोलताना शरद पवारांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेत रोहित पवार भविष्यात संपूर्ण महाराष्ट्राची सेवा करतील, असे सांगत त्यांचे राजकीय भवितव्य “फिक्स” करायचा प्रयत्न केला. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर आपल्याला टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या. वसंतदादा पाटलांनंतर आपण मुख्यमंत्री झालो. त्यानंतर एकदा नव्हे तर चार वेळा मुख्यमंत्री झालो. रोहित पवारने गेली 5 वर्षे कर्जत जामखेडकरांची सेवा केली. आता इथून पुढे तो महाराष्ट्राची सेवा करेल, असे शरद पवार म्हणाले.
पवारांच्या या वक्तव्यातून माध्यमांनी लगेच वेगवेगळ्या अर्थ काढले. रोहित पवारांच्या मुख्यमंत्री पदाला शरद पवारांचा पाठिंबा आहे, किंबहुना ते तसे प्रयत्न करत आहेत, असे मराठी माध्यमांनी बातम्यांमध्ये नमूद केले. पण यातूनच आपल्या मुलीची राजकीय डाळ महाराष्ट्रात शिजत नाही हे पाहून पवारांनी आपला मोहरा वळवून नातवावर बेट लावायला सुरुवात केली की काय??, असा सवालही तयार झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App