‘सारथी’ चे विभागीय कार्यालय, अभ्यासिका, वसतिगृह व वनभवन इमारतींच्या कामाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

Sarathi

विशेष प्रतिनिधी 

नाशिक : नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) च्या 156 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या विभागीय कार्यालय, अभ्यासिका, 500 मुलांचे व 500 मुलींच्या वसतिगृह इमारतींचे तसेच 43 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या धनगर समाजातील 100 विद्यार्थी व 100 विद्यार्थीनी साठी वसतिगृह व कार्यालय इमारत आणि 25 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणा-या वनभवन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे व मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून भुमिपूजन झाले.Sarathi office hostel studyroom inaguration

भूमिपूजन समारंभ कार्यक्रमास आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, माजी मंत्री महादेव जानकर,माजी खासदार हेमंत गोडसे, सकल मराठा समाज व सकल धनगर समाजातील मान्यवर आदी उपस्थित होते.

यावेळी सकल मराठा समाज बांधव आणि सकल धनगर समाज बांधव यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार करण्यात आला. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केलेल्या विविध विकास कामांवर आधारीत विकास पर्व या पुस्तिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Sarathi office hostel studyroom inaguration

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात