Udaynidhi Stalin : सनातन धर्माला शिव्या देणाऱ्या चिरंजीवाला स्टालिन यांची बक्षिसी; उदयनिधी तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्री पदी!!

Udaynidhi Stalin deputy CM Tamilnadu

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Udaynidhi Stalin लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सनातन धर्माला डेंग्यू, मलेरिया, एड्स म्हणून शिव्या घालत त्याचे निर्मूलन करायची वल्गना करणाऱ्या चिरंजीवाला शिक्षा करण्याऐवजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी बक्षीस दिले. उदयनिधी स्टालिन यांची उपमुख्यमंत्री पदी नेमणूक करून द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचा वारसदार एकप्रकारे जाहीर करून टाकला. त्याचवेळी स्टालिन यांनी तामिळनाडू मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले. आज दुपारी 3.30 वाजता उदयनिधी आणि नव्या मंत्र्यांचा राजभवनावर शपथविधी होईल. Udaynidhi Stalin

उदयनरी स्टाईल यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या आधी आणि नंतर देखील सनातन धर्माला शिव्या घातल्या होत्या सनातन धर्माची तुलना त्यांनी डेंग्यू मलेरिया एड्स या घातक रोगांशी करून त्याच्या निर्मूलनाची वल्गना केली होती. त्यावरून देशात प्रचंड संताप उसळला होता. पण मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी उदयनिधींवर कुठलीही कारवाई केली नाही. उलट त्यांना द्रमुक पक्षाच्या लोकसभेतल्या विजयाचे श्रेय दिले. काल रात्री उशिरा उदयनिधी यांच्या उपमुख्यमंत्री पदाची घोषणा केली. त्याचवेळी काही मंत्र्यांना वगळले देखील आहे. Udaynidhi Stalin

उदयनिधी यांच्याबरोबरच व्ही सेंथिल बालाजी, डॉ. गोवी, आर. राजेंद्रन आणि थिरू एस. एम. नासर या नव्या मंत्र्यांकाही देखील शपथविधी होईल. यापैकी व्ही. सेंथिल बालाजी मनी लॉंडरिंग केस बद्दल तुरुंगात होते. त्यांची सुप्रीम कोर्टाने जामीनावर सुटका केली आहे. त्यामुळे त्यांना लगेच पुन्हामंत्रिपदाची बक्षिसी मिळाली आहे.

Udaynidhi Stalin deputy CM Tamilnadu

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात