प्रतिनिधी
मुंबई : भारताचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना सोमवारी देशभरात साजरा होत असताना माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दुर्गराज रायगडावर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते.Dumdumalami Swarajya capital with the shout of Mother India; Sambhaji Raj hoisted the flag at Raigad!!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दुर्गराज रायगडवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. यावेळी नगारखान्यासमोर ध्वजारोहण करून पोलीस प्रशासन व शेकडो शिवभक्तांसह त्यांनी राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली.
आपल्या पोस्टमधून संभाजीराजे छत्रपती यांनी असे म्हटले की, अगणित वीरांच्या बलिदानातून १९४७ साली आपला देश इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. या क्रांतिकारी लढ्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यातून आली होती, हे हुतात्मा भगतसिंहांचे जीवनचरित्र आपल्याला सांगून जाते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने दुर्गराज रायगडवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. यावेळी नगारखान्यासमोर ध्वजारोहण करून पोलीस प्रशासन व शेकडो शिवभक्तांसह राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली. pic.twitter.com/erf8X1eRCv — Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 15, 2022
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने दुर्गराज रायगडवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. यावेळी नगारखान्यासमोर ध्वजारोहण करून पोलीस प्रशासन व शेकडो शिवभक्तांसह राष्ट्रीय ध्वजास सलामी दिली. pic.twitter.com/erf8X1eRCv
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 15, 2022
६ जून १६७४ रोजी दुर्गराज रायगडवर सार्वभौम स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्षे परचक्रात सापडलेल्या भारतभूमीच्या सुपुत्रांना स्वातंत्र्याचा बाणा शिकविला. स्वराज्य व स्वातंत्र्याचे मूर्तिमंत शक्तिस्थळ असलेल्या दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आणि शिवभक्तांच्या साथीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करणे, ही अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे, अशा भावना संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या पोस्ट मधून व्यक्त केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more