मुकेश अंबानींच्या कुटुंबाला धमकीचे 8 फोन, 3 तासांत सगळ्यांना संपविण्याची धमकी!!; सगळीकडे हाय अलर्ट!!


वृत्तसंस्था

मुंबई :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त देशभरात सगळीकडे हाय अलर्ट असताना मुंबईत एक खळबळजनक घटना घडली आहे. प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटल येथे फोन करून ही धमकी देण्यात आली आहे. धमकीचे 7 ते 8 कॉल केल्याची माहिती असून, अंबानी कुटुंबाला 3 तासांत जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 8 threatening phone calls to Mukesh Ambani’s family

अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा फोन कॉल आल्यामुळे खळबळ उडाली आहे. रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलमध्ये एका अज्ञात माथेफिरून फोन करून धमकी दिली आहे. या माथेफिरूने 7ते 8 वेळा फोन केल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीनंतर रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलने डी. बी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे


भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा विश्वास


 

या आधी अंबानींच्या निवासस्थानासमोर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क केल्याचा मुद्दा आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला होता त्यातूनच मनसुख हिरेन प्रकरण बाहेर आले होते आजही त्या प्रकरणातला मुख्य आरोपी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे तुरुंगात आहे आणि त्यानंतर आता प्रत्यक्ष अंबानी कुटुंबीयांना धमकीचे फोन कॉल येणे ते देखील एक दोन नव्हे, तर 8 फोन कॉल येणे, यामुळे त्यांच्या सुरक्षेविषयीचे गांभीर्य वाढले आहे.

रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलमध्ये हे फोन करण्यात आले होते. एकूण 8 फोन करण्यात आले होते. या अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयाला जीवे मारण्याची धमकी दिली.  या व्यक्तीने एकापाठोपाठ असे 8 फोन कॉल केले होते, या प्रकारानंतर आम्ही डीबी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती , रिलायन्स फाऊंडेशन हॅास्पिटलच्या डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांनी दिली. फोनवर धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपले नाव अफजल असल्याचे सांगितले.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अर्वाच्च भाषा वापरणे याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोरील व्यक्ती हा वारंवार एकच बोलत होता, मी अंबानी कुटुंबीयांना मारणार आहे, त्यांना मरावेच लागणार आहे, असे तो फोनवर बोलत होता. पोलिसांनी हे फोन कॉल रेकॉर्ड ऐकले आहे. त्यावरून हा व्यक्ती मानसिक रुग्ण किंवा कुठल्या तरी तणावाखाली असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही व्यक्ती मानसिक तणावाखाली असावी, त्यातून त्याने राग व्यक्त करण्यासाठी एकापाठोपाठ फोन केले असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मात्र या सर्व घटनेनंतर अंबानी कुटुंबीयांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. अंबानी यांच्या खासगी सुरक्षारक्षकांच्या प्रमुखांना मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची कल्पना दिली आहे. जर सुरक्षा वाढवण्याची गरज असेल तर तातडीने पाऊले उचलली जाणार आहेत. अंबानी यांच्या “अँटलिया” या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

8 threatening phone calls to Mukesh Ambani’s family

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!