शिंदे – फडणवीस खातेवाटपावर फडणवीसांचे राजकीय वर्चस्व!! गृह, अर्थ फडणवीसांकडे!!


प्रतिनिधी

मुंबई : शिंदे फडणवीस मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे  सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत:

राधाकृष्ण विखे-पाटील :  महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार : वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित : आदिवासी विकास

गिरीष महाजन :  ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे : बंदरे व खनिकर्म

संजय राठोड : अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे : कामगार

संदीपान भुमरे : रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत : उद्योग

तानाजी सावंत : सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

रवींद्र चव्हाण : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार : कृषी

दीपक केसरकर : शालेय शिक्षण व  मराठी भाषा

अतुल सावे : सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई : राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा : पर्यटन, कौशल्य विकास, उद्योजकता, महिला व बालविकास

Fadnavis political dominance over Shinde-Fadnavis account sharing

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती