विनायक मेटे यांचे अपघाती निधन, दिग्गज राजकीय नेत्यांनी केला शोक व्यक्त


विशेष प्रतिनिधी 

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीचा पहाटे 5.30 वाजता भाताण बोगद्याजवळ अपघात झाला होता. त्यानंतर त्यांना पनवेलच्या येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. Shiv Sangram leader Vinayak Mete passed away accidentally, breathed his last at the age of 52

मिळालेल्या माहितीनुसार, मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिल्याची माहिती आहे. विनायक मेटे यांचा मुलगा गाडी चालवत होता. यामध्ये त्यांचा मुलगाही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.


शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांनी अख्रेर मागितली ब्राह्मण समाजाची जाहीर माफी


विनायक मेटे आपला एक सहकारी आणि अंगरक्षक यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला येत होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार प्रवीण दरेकर एमजीएम रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले.

नेमका कसा झाला अपघात?

विनायक मेटे यांच्या कारला एका मोठ्या ट्रकने बाजूने धडक दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. “आम्ही बीडवरून मुंबईकडे येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकने कट मारला. ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. आमचा अपघात 5 वाजता झाला. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रतिसाद दिला नाही. जवळपास 6 वाजता रुग्णवाहिका आली,” अशी माहिती विनायक मेटेंचे सोबत असणारे सहकारी एकनाथ कदम यांनी दिली.

मराठा समाजाला न्याय देणारा नेता

भाजप नेते विनोद तावडे यांनी शोक व्यक्त करत म्हटले की, शेतकरी, शेतमजूर, गरीब आणि मराठा समाजाला न्याय देणारा नेते म्हणून मेटे यांची ओळख होती. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले होते. त्यांना आता समाजासाठी खूप काही करण्याची संधी होती. मात्र, त्याचे अचानक जाणे हे खऱ्या अर्थाने एक खूप मोठे नुकसान आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज पहाटे पाच वाजता मी देखील मराठा समाजाच्या बैठकीसाठी निघालो होतो. आज दुपारी 12 वाजता सह्याद्रीवर बैठक होती. मेटे यांच्या चालकाचा मला सकाळी 5.15 वाजता फोन आला. मेटे यांचे जाणे हा खूप मोठा धक्का आहे. 15 दिवसांपूर्वीच त्यांच्या वाढदिवसाला मी गेलो होतो. ते मराठा आरक्षणासाठी सातत्याने झगडत होते. काल रात्री त्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणे झाले. त्यांच्या असे जाणे अत्यंत दु:खद आहे.

माजी खासदार संभाजी छत्रपती म्हणाले की, अत्यंत दु:खद आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. विनायक मेटे हे बेधडकपणे समाजाला न्याय देण्यासाठी आपली भूमिका नेहमी राबवत होते. मोजक्या आमदारांपैकी ते एक असे आमदार होते, जे की विधान परिषदsमध्ये आपली भूमिका स्पष्टपणे मांडायचे. समाजासाठी हा खूप मोठा तोटा आहे. हा तोटा भरून कसा आणता येईल हा मोठा प्रश्न आहे.

Shiv Sangram leader Vinayak Mete passed away accidentally, breathed his last at the age of 52

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था