विनायक ढेरे
1857 च्या पहिल्या स्वातंत्र्य समरापासून पासून 1947 पर्यंतच्या स्वातंत्र्य चळवळीपर्यंत ज्ञात – अज्ञात क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी जहाल, मवाळ हिंसक आणि अहिंसक स्वातंत्र्य चळवळ करून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. 15 ऑगस्ट 1947 रोजी सकाळी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अखेरचे ब्रिटिश व्हॉईसरॉय माउंटबॅटन यांच्या समावेत राजधानी दिल्लीत तिरंगा फडकवला देखील. त्या सोहळ्याचे विविध वृत्तवाहिन्यांनी केलेले चित्र आजही युट्युब वर उपलब्ध आहे. Pandit Nehru hoisted the national flag, but Gandhiji, Savarak and Netaji Subhash Chandra Bose were not invited for official programs
भारतीय स्वातंत्र्याची पहाट ही मानवी स्वातंत्र्याची पहाट असल्याचे पंडित नेहरूंनी आपल्या त्या वेळच्या भाषणात सांगितले होते. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री त्यांचे ऐतिहासिक भाषणही सुप्रसिद्ध आहे. जेव्हा सगळे जग निद्राधीन झाले आहे आहे, तेव्हा भारतात स्वातंत्र्याची पहाट होते आहे. भारत सगळ्या जगाला मानवतेचे स्वातंत्र्य मिळवून देईल, असा आत्मविश्वास त्यांनी जागवला होता. पंडितजींचे ऐतिहासिक भाषण 15 ऑगस्ट 1947 चा ऐतिहासिक दिन हा समस्त भारतीयांसाठी अभिमानाचा विषय होता!!
पण भारताच्या दुर्दैवाने हे खंडित भारताचे स्वातंत्र्य होते. भारताचा एक महत्त्वाचा हिस्सा पाकिस्तानच्या रूपाने अलग झाला होता. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि तीन स्वतंत्र विचारधारांचे प्रतिनिधित्व करणारे सर्वोच्च नेते या दिमाखदार सोहळ्यात नेमके होते कोठे??, हा प्रश्न त्यावेळी कोणी विचारला नाही. गेल्या 60 – 70 वर्षात कोणी उपस्थित केला नाही. पण आता मात्र सोशल मीडिया प्रभावी ठरल्यानंतर हा प्रश्न आवर्जून विचारला जातो आहे.
– गांधीजी, सुभाष बाबू, सावरकर होते कोठे?
महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे तीनही नेते 15 ऑगस्ट 1947 रोजी नेमके होते कोठे?? ते भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्या कार्यक्रमाला उपस्थित होते का??, त्यांना सन्मानपूर्वक निमंत्रण दिले गेले होते का??, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत आणि हे अक्षरशः खरे आहे की की क्रांतिकारक हिंदुत्ववादी विचारसरणीचे सर्वोच्च नेते सावरकर, अहिंसक लढ्याचे सर्वोच्च नेते महात्मा गांधी आणि आझाद हिंद सेनेच्या पहिल्या सरकारचे पंतप्रधान नेताजी सुभाष चंद्र बोस हे तीनही सर्वोच्च नेते अर्थातच भारतीय स्वातंत्र्याची जिवंत त्रिमूर्ती पहिल्या स्वातंत्र्य दिनाला राजधानीतच काय पण कोठेच सार्वजनिक कार्यक्रमात हजर नव्हते!!
Azadi Ka Amrit Mahostav : स्वातंत्र्यपूर्व काळात गाजलेली व्यंगचित्रे आणि त्यांचे समाजमनावर परिणाम!!
गांधीजी बंगालच्या नौआखालीत
महात्मा गांधींना मूळातच खंडित भारत मान्य नव्हता. त्यामुळे ते हिंदू मुस्लिम दंगल शांत करण्यासाठी दूर बंगाल मधल्या नौआखालीत होते. फाळणीमुळे हिंदू मुस्लिम दंगे पेटले होते. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान मध्ये हिंदूंचे शिरकाण चालले होते. हिंदू प्रतिकार करत होते. परंतु तो प्रतिकार आक्रमणाच्या तुलनेत दुबळा होता. हिंदू मुस्लिम दंगे थांबवण्यासाठी गांधीजींनी पश्चिम पाकिस्तानच्या ऐवजी पूर्व पाकिस्तान निवडला आणि ते नौआखाली मध्ये जाऊन बसले होते तेथे ते हिंदू – मुस्लिम ऐक्याचा नवा प्रयोग करत होते. पण हे दंगे शमले नाहीत कारण दंगेखोरांना पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा मुस्लिमांना “थेट कृतिशील” पाठिंबा होता.
– सुभाष बाबू गुमनामी बाबा
नेताजी सुभाष चंद्र बोस हे “अज्ञातवासात” होते. त्यांचे आधीच फार्मोसा बेटावर म्हणजे सध्याच्या तैवान मध्ये विमान अपघातात निधन झाल्याचे त्यावेळी पसरवले गेले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे गारुड त्याकाळच्या भारतीय समाजमनावर एवढे पसरले होते, की नेताजी हे विमान अपघातात मृत्यू पावले आहेत हे “सत्य” मानून सगळा भारतीय समाज चालला होता. मात्र, ते नेताजी गुमनामी बाबांच्या रूपाने त्यावेळी हिंदुस्थानात हजर होते. हे आता ऐतिहासिक संशोधनातून सिद्ध झाले आहे!! त्यांनी 15 ऑगस्ट 1947 या दिवशी नेमके काय केले??, हे मात्र इतिहासाला अज्ञात आहे.
– सावरकर मुंबईत, पण निमंत्रण नव्हते
सावरकरांना, ते मुंबईत शिवाजी पार्कवरील आपल्या सावरकर सदनात राहत असताना त्यांना मुंबई प्रांताच्या राजधानीत स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमाला निमंत्रणच नव्हते. त्यावेळचे मुंबईचे पंतप्रधान बाळ गंगाधर खेर (त्यावेळी मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानच म्हटले जात असे) यांच्या हस्ते आजच्या शिवाजी पार्कवर भारतीय स्वातंत्र्याचा पहिला तिरंगा फडकवला गेला होता. परंतु, या सरकारी कार्यक्रमाला सावरकरांना निमंत्रण नव्हते.
– सावरकर सदनावर तिरंगा आणि हिंदू ध्वज
सावरकरांनाही खंडित भारत असे स्वातंत्र्य डाचतच होते. परंतु, त्यांनी लोकमान्य टिळकांच्या धोरणानुसार जे मिळाले आहे, ते घ्यावे आणि उर्वरित मिळवण्यासाठी संघर्ष करावा या तत्त्वानुसार भारताचे स्वातंत्र्य मान्य केले होते आणि त्यांनी आपल्या सावरकर सदनावर एकाच वेळी भारताचा तिरंगा आणि सावरकरांच्या स्वतःच्या संकल्पनेतील कुंडलिनी कृपाण हिंदुध्वज फडकवले होते.
– कृतक सत्ताधारी आणि कुटील ब्रिटिश
वास्तविक महात्मा गांधी, सुभाष बाबू आणि सावरकर हे भारताच्या तीन राजकीय विचारप्रणालींचे त्या वेळचे सर्वोच्च नेते होते. भारताने स्वीकारलेल्या लोकशाही प्रणालीनुसार त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी या तीनही नेत्यांना निमंत्रण देणे अपेक्षित होते. परंतु त्यावेळेसचे सरकार मुळातच सुभाष बाबूंना “मृत” मानत होते. आणि हे तिन्ही नेते ब्रिटिशांबरोबर झालेल्या “ट्रान्सफर ऑफ पॉवरच्या” वाटाघाटी मध्ये संमलित झाले नव्हते. किंबहुना कुटील ब्रिटिशांनी अतिशय राजकीय चातुर्याने या तीनही नेत्यांना “ट्रान्सफर ऑफ पॉवरच्या” वाटाघाटींमधून दूर ठेवले होते… पण म्हणून त्यावेळच्या सत्ताधारी भारतीय नेत्यांनी या तीनही सर्वोच्च नेत्यांना भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला साधे निमंत्रणही देऊ नये यासारखे दुसरे कृतक पण नव्हते. पण हे घडून गेले. ही ऐतिहासिक चूक होती, हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सत्य प्रस्थापित होत आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App