विनायक मेटेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; पत्नी डॉ. ज्योती मेटेंनी अपघाताच्या चौकशीची मागणी


  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

प्रतिनिधी

बीड : मराठा आरक्षणाच्या मध्यवर्ती आश्वासापर्यंत लढा देणारे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले त्यांच्या पार्थिवावर आज शासकीय इथं मामा कांती संस्कार करण्यात आले लाखो मराठा बांधवांनी त्यांना साश्रोनेयनांनी अखेरचा निरोप दिला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते Funeral of Vinayak Meten with state honors

मात्र, त्याचवेळी विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी मेटेंच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला असून अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे.

विनायक मेटे यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी बीडमध्ये राज्यभरातून शिवसंग्रामचे कार्यकर्ते दाखल झाले होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी (14 ऑगस्ट) पहाटे अपघाती निधन झाले. त्यांचे पार्थिव रात्री उशिरा बीडमध्ये आणल्यानंतर बीडमध्ये शिवसंग्राम भवन येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर दुपारी मेटे यांच्या पार्थिवावर बीड येथील उत्तमनगरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असून त्यासह राजकीय क्षेत्रातील अनेक नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरीकांनी मोठी गर्दी केली.

मेटेंची समाजासाठी लढण्याची धडपड

अंत्यसंस्कारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, की, मेटेंचा अपघात झाल्याची माहिती समजताच मी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तातडीने निघालो. मनाला न पटणारी घटना घडली. वेदना देणारी ही घटना राज्यात घडली. काही माणसं कुटुंबापुरती मर्यादीत नसतात तर त्यांची समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असते. तीच तळमळ विनायक मेटेंची होती. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी अविरत लढा दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे संवेदनशिल नेते होते अशी भावना व्यक्त केली.

साश्रू नयनांनी निरोप

अंत्ययात्रेला सुरुवात झाली तेव्हा कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले. यावेळी अनेकांना अश्रु रोखता आले नाहीत. अखेरचा निरोप देताना टाळ – मृदंगाचा गजर व विनायक मेटे यांचा जयघोष करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बशीरगंज, बलभीम चौक, माळीवेस, सुभाष रोड, शाहूनगरमार्गे अंत्ययात्रा कॅनॉल रोडवरील रामदेव बाबा मैदानमार्गे अंत्यसंस्कारस्थळी आली. फुलांची आरास केलेल्या रथात विनायक मेटे यांचे पार्थिव ठेवला होता. कुटुंबातील सदस्य या रथातून अंत्यसंस्कारस्थळी पोहचले.

येथे अंत्यसंस्कार

शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपमागील उत्तमनगर येथे विनायक मेटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.

चौकशीचे आदेश

मेटे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानंतर तपासासाठी 8 जणांची टीम तयार करण्यात आल्याचे रायगडचे पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने मेटे यांच्या कारने अज्ञात वाहनाला धडक दिल्याचे पोलिसांनी नोंदवलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटला

रविवारी दुपारी 12 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक आयोजित केली होती. मराठा मोर्चाचे समन्वयक तसेच प्रमुख नेत्यांना बैठकीचे आमंत्रण होते. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मेटे शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास बीड येथून निघाले. ते पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास द्रुतगती महामार्गावरील माडप बोगद्याजवळ आले असता त्यांच्या कारचालकाचा ताबा सुटल्याने कार भरधाव ट्रकला धडकली. महामार्ग पाेलिसांनी त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

तासभर मदत नाही

अपघातानंतर तासभर मेटे यांना मदत शकली नाही, असा आरोप त्यांच्या चालकाने केला आहे. अपघाताची माहिती 100 नंबरला देऊनही तासभर रुग्णवाहिका आलीच नाही. कंट्रोल रूमला तातडीने हालचाली झाल्या नाहीत. 1 तास हायवेवर मी मदतीची विनवणी करत होतो. शेवटी एका टेम्पोचालकाने गाडी थांबवली आणि मेटे साहेबांना रुग्णालयात आणले, असे मेटेंचे कारचालक एकनाथ कदम यांनी सांगितले.

पाच टर्म राहिले आमदार

विनायक मेटे हे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे होते. सामान्य परिस्थितीतून मराठा महासंघाच्या आंदोलनातून ते पुढे आले. सर्वप्रथम ते पहिल्या शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात आमदार झाले. नंतर सलग ५ वेळा ते विधान परिषद सदस्य राहिले. शिवसंग्राम पक्षाचे ते प्रमुख होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील ते प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. अरबी समुद्रात उभारण्यात यावयाच्या शिवस्मारक समितीचे ते अध्यक्षदेखील होते.

Funeral of Vinayak Meten with state honors

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*