हाँगकाँगमधून वर्षभरात १.१२ लाख लोकांचे पलायन : राष्ट्रपती जिनपिंग यांची धोरण, कोरोना निर्बंध कारणीभूत


वृत्तसंस्था

हाँगकाँग : कोरोनाचे कडक निर्बंध व शी जिनपिंग यांच्या सरकारच्या धोरणांमुळे हाँगकाँगमधून पलायन सुरू झाले आहे. त्यामुळे हाँगकाँगची लोकसंख्या वेगाने घटत चालली आहे. 1.12 lakh people flee from Hong Kong in a year President Xi Jinping’s policy, Corona restrictions cause

येथे वर्षभरात सुमारे १.१२ लाख नागरिकांनी स्थलांतर केले आहे. एक वर्षापूर्वी हाँगकाँग सोडणाऱ्यांची संख्या ८९ हजार २०० होती. पलायन करणाऱ्यांमध्ये हाँगकाँगच्या कायमस्वरूपी नागरिकांचाही समावेश आहे.

त्याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थी व स्थलांतरित नागरिक देखील शहर सोडून जात आहेत. गेल्या वर्षभरात लोकसंख्या १.६ टक्के घटली. ती ७२.९ लाखांवर आली आहे. एक वर्षापूर्वी लोकसंख्या ७४.१ लाख होती.

१९६१ नंतर लोकसंख्येतील ही सर्वात मोठी घट आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लोकसंख्येतील ही घट धोरणामुळे नव्हे तर नैसर्गिक स्वरूपातील आहे. हाँगकाँगमध्ये मृत्युदराच्या तुलनेत जन्मदर अतिशय कमी आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षांत सामाजिक उलथापालथ वाढली आहे. परंतु लोकशाहीवादी आंदोलनाच्या विरोधातील कडक कारवाईनंतर नागरिकांनी शहर सोडण्यास सुरुवात केली.

कोरोना संसर्गादरम्यान प्रवासावर निर्बंध व हवाई सुविधा देखील बंद करण्यात आल्या होत्या. जगभरात लॉकडाऊन संपुष्टात आले होते. तेव्हा हाँगकाँगमध्ये लॉकडाऊन लागू होते. नागरिकांना कैदेत असल्यासारखे वाटत होते. बहुतांश उद्योगही बंद पडले होते. हाँगकाँगचा जन्मदर आशियात सर्वात कमी होता.

लोकशाही समर्थकांचे हाँगकाँगमध्ये दमन

हाँगकाँगमध्ये सरकारविरोधी निदर्शनानंतर लोकशाही समर्थकांवर संकट आले आहे. अशा नागरिकांसाठी अमेरिका, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी नवीन व्हिसा दिले होते. अनेक कार्यकर्त्यांनी तैवानमध्ये आश्रय घेतला होता. हाँगकाँगमध्ये असलेल्या नागरिकांचे प्रशासन दमन करत आहे.

1.12 lakh people flee from Hong Kong in a year President Xi Jinping’s policy, Corona restrictions cause

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात