विशेष प्रतिनिधी
पुणे: हिंदू दृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या खंबीर पाठींब्यामुळेच माझ्यानाटकाचे पुढचे प्रयोग विनाविघ्न पार पडले. या नाटकाला विरोध करणाऱ्यांना तुडवायचेच अशा सूचना बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना देऊन ठेवल्या होत्या. त्यानुसार ”काही तुडवायचे कार्यक्रम” देखील झाले, असे अभिनेते शरद पोंक्षे यांनी सांगितले.Due to Balasaheb, shows of ‘Me Nathuram Godse …’ were without any hindrance, he had given instructions to Raj Thackeray to trample the protesters.
सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांच्या मी आणि नथुराम या पुस्तकाच्या नवव्या आवृत्तीच्या लोकार्पण सोहळा आणि त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुधीर गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देतांना शरद पोंक्षे यांनी त्यांच्या अभिनय कारकीदीर्तील अनेक किस्से आणि प्रसंग सांगून विविध आठवणींना उजाळा दिला.
पोंक्षे म्हणाले की, नथुराम गोडसेंचे व्यक्तिमत्व हे धगधगत्या ज्वालामुखी सारखे होते. ते व्यक्तीमत्व आणि गांधीहत्या या घटना अतिशय प्रभावीपणे प्रदीप दळवी यांनी त्यांच्या लेखणीतून उतरवले, तर विनय आपटे सारख्या दिग्दर्शकाने ते व्यक्तिमत्व प्रभावीपणे मांडले. नथुराम गोडसे हे व्यक्तिमत्व साकारणारे साजेसे कलाकार विनय आपटे यांना मिळत नव्हते.
अपघातानेच मी या नाटकाच्या तालमीला गेलो आणि मला ही भूमिका मिळाली. तसे पाहिले गेल्यास 1988 सालीच हे नाटक लिहून तयार होते. या भूमिकेसाठी काही समकालीन प्रतिथयश कलाकारांना विचारणा करण्यात आली होती. परंतु, हा विस्तव कोणीही तळहातावर घ्यायला तयार नव्हते आणि योगायोगाने दहा वर्षांनंतर ही भूमिका माज्याकडे आली.
विनय आपटे यांचे दिग्दर्शन या नाटकाला लाभले असल्याने सकाळी 10 ते 5 तालमीसाठी सभागृह आरक्षित असतांना केवळ एक ते दीड तास प्रत्यक्षात तालीम होत असे. कारण विनय आपटेंच्या दिग्दर्शनाच्या पद्धतीनुसार त्यांनी नथुराम गोडसे आणि तत्कालीन समाज व्यवस्था आमच्यात रुजवली.
त्याव्दारे आमच्याकडून त्यांनी नैसर्गिक अभिनय करून घेतला. सिधुताई गोडसे आणि गोपाळराव गोडसे यांच्यासोबत मी तासनतास गप्पा मारल्या. त्यातून नथुराम गोडसे हे व्यक्तिमत्व वास्तवदर्शी पद्धतीने मी आत्मसात करू शकलो.
पोंक्षे म्हणाले, नाटकाच्या प्रारंभीच्या आणि शुभारंभाच्या प्रयोगांना अनेक राजकीय पक्षांच्या रोषाला आणि विरोधाला, मोर्चांना आम्हाला सामोरे जावे लागले. माज्या घरी अनेकदा घाणेरड्या, गलिच्छ भाषेत धमकीचे फोन आले. पण या सगळ्या कठीण प्रसंगात केवळ आणि केवळ हिंदू दृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
त्यांच्या खंबीर पाठींब्यामुळेच माझ्या नाटकाचे पुढचे प्रयोग विनाविघ्न पार पडले. या नाटकाला विरोध करणाऱ्यांना तुडवायचेच अशा सूचना बाळासाहेबांनी राज ठाकरे यांना देऊन ठेवल्या होत्या. त्यानुसार ”काही तुडवायचे कार्यक्रम” देखील झाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App