अलिगड मुस्लिम विद्यापीठाला जमीन दान करणाऱ्या क्रांतिकारक राजा महेंद्र प्रताप सिंग यांच्या नावे अलिगड मध्येच स्वतंत्र विद्यापीठ
वृत्तसंस्था
अलीगड : उत्तर प्रदेशात योगी सरकार प्रख्यात क्रांतिकारक राजा महेंद्र प्रताप सिंग यांच्या नावाने अलिगड मध्ये स्वतंत्र राज्य विद्यापीठ उघडणार आहे. या विद्यापीठाचा भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 सप्टेंबर रोजी होत आहे. राजा महेंद्र प्रताप यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठ पिठासाठी जमीन दान केली होती. परंतु त्यांच्या नावाचा उल्लेख अलीगढ मुस्लिम विद्यापीठात कोठेही नाही. एक कोनशिला देखील त्यांच्या नावाने अलीगढ मुस्लिम विद्यापीठाने उभारलेली नाही. DU to open Savarkar college and in alighad there will be state university named after Raja Mahendra Pratap Singh
अलिगड मध्ये राजा महेंद्र प्रताप सिंग यांच्या नावाने राज्याचे विद्यापीठ उभारण्याची घोषणा 2019 मध्येच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने जरी राजा महेंद्र प्रताप सिंह यांचे नाव त्यांच्या विद्यापीठात कोठेही दिले नसले तरी राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्या नावाने अलिगड मध्ये स्वतंत्र विद्यापीठ उघडण्यात येणार असल्याने या प्रख्यात क्रांतिकारकाचे नाव अलिगडसह आता संपूर्ण उत्तर प्रदेशात शैक्षणिक क्षेत्रात उजळत राहील, अशा भावना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केल्या आहेत.
राजा महेंद्र प्रताप सिंग हे क्रांतिकारक होते. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आदींच्या क्रांतिकारक विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव होता. 1921 मध्ये त्यांनी अफगाणिस्तानात जाऊन स्वतंत्र भारताच्या सरकारची घोषणा केली होती. भारताच्या त्यावेळच्या अस्थायी सरकारचे ते अध्यक्ष होते. या सरकारला त्यावेळच्या स्वतंत्र अफगाणिस्तान सरकारने अधिमान्यता दिली होती. त्याच बरोबर जर्मनीसारख्या ब्रिटनच्या शत्रू राष्ट्रांनी देखील राजा महेंद्र प्रताप सिंग यांना भारताचे राष्ट्र प्रमुख मानले होते.
राजा महेंद्र प्रताप सिंह हे लोकसभेत दोन वेळा निवडून आले होते. सन 1957 मध्ये दिल्लीत भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचा – 1857 स्वातंत्र्यसमराचा शताब्दी महोत्सव साजरा झाला. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समावेत राजा महेंद्र प्रताप सिंग हे हा समारंभ साजरा करण्यात आघाडीवर होते. सावरकरांसमावेत त्यांनी नवी दिल्लीतल्या जनपथ हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेला देखील संबोधित केले होते. त्याचे छायाचित्र त्यावेळी टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध झाले होते.
सावरकरांना त्यांची भगुरमधील पैतृक संपत्ती परत मिळावी यासाठी खासदार या नात्याने राजा महेंद्र प्रताप सिंग यांनी नेहरू सरकारकडे सातत्याने मागणी केली सावरकरांची त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते.
दिल्ली विद्यापीठ सावरकरांच्या नावाने दिल्लीत स्वतंत्र महाविद्यालय सुरू करत आहे, तर राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्या नावाने अलिगड मध्ये स्वतंत्र विद्यापीठ सुरू होत आहे हा एक अनोखा योगायोग मानला पाहिजे. केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार सावरकर आणि राजा महेंद्र प्रताप सिंग या प्रख्यात क्रांतिकारकांचा भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सन्मान करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App