नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णालयात रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सची गरज असताना जिल्हाधिकारी आणि रोटरी वेलनेस सेंटरने मिळून रेमडेसिव्हीरचा साठा बाहेर विकला, असा आरोपर नंदुरबारच्या भारतीय जनता पक्षच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी केला आहे.District Collector sells stock of injections on Remedivisi!
विशेष प्रतिनिधी
नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णालयात रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सची गरज असताना जिल्हाधिकारी आणि रोटरी वेलनेस सेंटरने मिळून रेमडेसिव्हीरचा साठा बाहेर विकला, असा आरोपर नंदुरबारच्या भारतीय जनता पक्षच्या खासदार डॉ. हिना गावित यांनी केला आहे.
गावित म्हणाल्या, आज नंदुरबारमध्ये रेमेडिसीव्हीरची प्रचंड आवश्यकता आहे. असे असतानाही रोटरी वेलनेस सेंटरने रुग्णांना इंजेक्शन न देता ते बाहेर विकण्याचं काम केलं. दवाखान्यांना अजूनही इंजेक्शन देण्यात आले नाहीत.
याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करुन हीना गावित म्हणाल्या की, ‘नंदुरबार जिल्ह्यातील गावोगावी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. दवाखान्यांमध्ये आज रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सची मोठी गरज भासत आहे.
मला दिवसातून प्रत्येक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दोन ते तीन वेळा फोन केला की, आमच्याकडे इतके रुग्ण आहेत पण आमच्याकडे इंजेक्शन नाही. रुग्णालयांना इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार विनंती केली.
ज्या प्रमाणे रोटरी वेलनेस सेंटरला इंजेक्शन उपलब्ध करुन दिले, तसेच दवाखान्यांनाही हे इंजेक्शन उपलब्ध करुन द्या. पण जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. शेवटी मी पत्रकार परिषद घेतल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी फक्त ५०० इंजेक्शन दवाखान्यांना दिले. रोटरी वेलनेस सेंटरला १ हजार इंजेक्शन देण्यात आले होते.
दवाखान्यांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांना इंजेक्शन मिळाले नसल्याचे कळाले. रोटरी वेलनेस सेंटरने हे इंजेक्शन बाहेरच्या बाहेर विकले. नंदुरबारचे जिल्हाधिकारी आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मिळून हे काम केले, असा गंभीर आरोप हीना गावित यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App