विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी यासाठी राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी काँग्रेसने आज थेट धडक मारली. काँग्रेसच्या आंदोलनाला विरोध म्हणून भाजपाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आजचे आंदोलन तात्परते मागे घेत आहोत, मात्र नरेंद्र मोदी महाराष्ट्राची माफी मागेपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.Direct heat of Congress at the residence of Devendra Fadnavis
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना महाराष्ट्राने देशात कोरोना पसरवला असा आरोप करुन शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान केला. मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला असून माफी मागावी यासाठी राज्यभर आंदोलन सुरु असून औरंगाबाद, नागपूर व भिवंडी येथे भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आले. फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी आज झालेल्या आंदोलनात नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी या भाग घेतला.
पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा अडवला पण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जेथे अडवले तेथेच त्यांनी आंदोलन केले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनाही पोलिसांनी अडवले तेथेच आंदोलन केले. प्रदेश सरचिटणीस अतुल लोंढे यांनी फडणवीसांच्या बंगल्यावर गनिमी काव्याने धडक देऊन भाजप नेत्यांचा निषेध केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मोदींचा निषेध करण्यासाठी वारकरी परिषदेचे विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वारकरी टाळ मृदुंगासह मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, शिवरायांच्या विचारांचा अपमान केला असून भाजपाने त्यांना पाठिंबा दिला आहे, आम्ही त्याचा निषेध करतो. मोदींनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितलीच पाहिजे ही आमची मागणी आहे. यासाठी आम्ही आज मुंबईत आंदोलन केले. काँग्रेस अहिंसावादी आहे, हिंसावादी नाही, आमचे आंदोलन झाले आहे. आम्हालाही गुंडगिरी करता येते पण ही आमची संस्कृती नाही. आम्हाला संदेश द्यायचा होता तो आम्ही दिला. परंतु भाजपाने आपला खरा चेहरा मुंबई आणि महाऱाष्ट्राला दाखवला.
भाजपानेच लोकांना रस्त्यावर आणून भाडोत्री लोक उतरवले त्यांनीच रस्ता जाम केला, त्यांच्यामुळे मुंबईकरांना आज त्रास सहन करावा लागला. मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आजचे आंदोलन आम्ही तात्पुरते मागे घेत आहोत पण हे आंदोलन सुरुच ठेवण्याची आमची भूमिका कायम आहे, असे पटोले यांनी सांगितले..
आजच्या आंदोलनात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हांडोरे, संजय राठोड, प्रदेश संघटन सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, राजेश शर्मा, प्रदेश काँग्रेसच्या व्हिजेएनटी सेलचे अध्यक्ष मदन जाधव, एनएसयुआयचे संदीप पांडे, राकेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App