deepali chavan case : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सध्या विरोधी पक्षात असलेल्या भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे. दीपाली चव्हाण या वनपरिक्षेत्र अधिकारी असलेल्या महिलेच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरूनही फडणवीस आणि भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळत आहे. आता तर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आरोप करत मुद्दाम या प्रकरणातील आरोपींचा बचाव केला जातोय की काय अशी शंका उपस्थित केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले असून त्यात सरकारवर आरोप करतानाच या प्रकरणी चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी यांची नियुक्ती तसेच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केलीय. Devendra fadnavis writes letter to CM Uddhav Thackeray in deepali chavan case
हेही वाचा..
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App