भारताच्या 7 शेजारी राष्ट्रांत कशी आहे हिंदूंची स्थिती? CDPHRच्या अहवालातून चिंता व्यक्त

CDPHR Report on status of Hindus in 7 neighboring countries of India

CDPHR Report : सेंटर फॉर डेमोक्रेसी प्युरलिझम अँड ह्यूमन राईट्सने (CDPHR) तिबेटसह पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशांतील मानवाधिकार अहवाल प्रसिद्ध केला आहे. सर्व देशांतील नागरी समानता, त्यांची प्रतिष्ठा, न्याय आणि लोकशाही या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल शिक्षणतज्ज्ञ, वकील, न्यायाधीश, पत्रकार आणि संशोधकांच्या गटाने तयार केला आहे. सेंटर फॉर डेमोक्रेसी प्लुरलिझम अँड ह्युमन राईट्सने भारताच्या सात शेजारी देशांच्या मानवाधिकार अहवालात हिंदूंच्या एकूण परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. CDPHR Report on status of Hindus in 7 neighboring countries of India


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सेंटर फॉर डेमोक्रेसी प्युरलिझम अँड ह्यूमन राईट्सने (CDPHR) तिबेटसह पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, मलेशिया, इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशांतील मानवाधिकार अहवाल प्रसिद्ध केला आहे. सर्व देशांतील नागरी समानता, त्यांची प्रतिष्ठा, न्याय आणि लोकशाही या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल शिक्षणतज्ज्ञ, वकील, न्यायाधीश, पत्रकार आणि संशोधकांच्या गटाने तयार केला आहे. सेंटर फॉर डेमोक्रेसी प्लुरलिझम अँड ह्युमन राईट्सने भारताच्या सात शेजारी देशांच्या मानवाधिकार अहवालात हिंदूंच्या एकूण परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे.

1. पाकिस्तान

CDPHRच्या अहवालात पाकिस्तानमधील मानवी हक्कांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अहवालानुसार धार्मिक अल्पसंख्याक तसेच शिया व अहमदिया या अल्पसंख्याकांचीही परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तेथील कलम 298 बी -२ नुसार अहमदिया मुस्लिमांनी अजान हा शब्द वापरणेदेखील गुन्हा आहे. यासह पाकिस्तानची कायदेशीर चौकट आंतरराष्ट्रीय नागरिक आणि राजकीय अधिकारांशीही जुळत नाही. तेथे धार्मिक अल्पसंख्याक असलेल्या हिंदू, शीख आणि ख्रिश्चन धर्माच्या तरुण स्त्रियांचे अपहरण, बलात्कार, बळजबरी धर्मांतर अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यासोबतच धार्मिक अल्पसंख्याकांना धमकावलेही जाते.

2. बांग्लादेश

बांग्लादेशात मानवाधिकार आणि धार्मिक अल्पसंख्याकांची परिस्थितीही चांगली नाही. ढाका विद्यापीठाचे प्राध्यापक अबुल बरकत यांनी दिलेल्या अहवालानुसार, गेल्या 4 दशकांत दरवर्षी 2,30,612 लोकांना पळून जावे लागत आहे. म्हणून दररोज सरासरी 632 लोक पळून जातात. या अहवालात असे म्हटले आहे की, जर तेथे त्याच वेगानं स्थलांतर होत राहिलं तर 25 वर्षांनंतर एकही हिंदू तिथे राहणार नाही. 1975 मध्ये घटना दुरुस्तीच्या माध्यमातून सेक्युलरिझम हा शब्द काढून त्याऐवजही पवित्र कुराणातील ओळींचा समावेश करण्यात आला. 1998 मध्ये इस्लामला देशाचा धर्म घोषित करण्यात आले. तसेच, चटगांव हिल प्रांताचे लोकसंख्याशास्त्र देखील नियोजित पद्धतीने बदलण्यात आले. 1951 मध्ये 90 टक्के नागरिक येथे बौद्ध होते, जे 2011 मध्ये घटून 55 टक्के राहिले आहेत.

3. तिबेट

या अहवालानुसार, विविध निर्बंधांच्या माध्यमातून चीनने तिबेटमधील मानवाधिकारांची स्थिती लपविण्याचा प्रयत्न केला आहे. याबरोबरच चीन तिबेटची सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि भाषिक ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.

4. मलेशिया

CDPHRच्या अहवालानुसार, मलेशियामध्ये भूमिपुत्रांच्या बाजूने भेदभाव करणारा कायदा आहे. सजातीय अल्पसंख्याकांच्या अधिकारांचेही यामुळे हनन होते.

5. अफगाणिस्तान

अफगाणिस्तानातील अहवालानुसार, येथे मानवाधिकार आणि अल्पसंख्याकांबद्दलचे भेदभावाचे धोरण यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अफगाणिस्तानच्या घटनेनुसार एखादी मुस्लिम व्यक्तीच देशाची राष्ट्रपती आणि पंतप्रधान होऊ शकते. 1970च्या लोकसंख्येनुसार येथे 7 लाख हिंदू आणि शीख होते. आता फक्त 200 हिंदू आणि शीख कुटुंबे शिल्लक आहेत.

6. श्रीलंका

श्रीलंकेतील मानवाधिकार आणि धार्मिक अल्पसंख्याकांच्या स्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 26 वर्षे चाललेल्या गृहयुद्धात 1,00,000 लोकांनी आपला जीव गमावला आणि 20,000 तामिळ बेपत्ता झाले, असे या अहवालात म्हटले आहे.

7. इंडोनेशिया

CDPHRच्या अहवालानुसार इंडोनेशियातही गेल्या काही वर्षांत धार्मिक कट्टरता आणि असहिष्णुता वाढली आहे. येथे फक्त 6 देशांनाच ओळख देण्यात आली आहे. 2002च्या बाली बॉम्बस्फोटात देशातील एका मोठ्या धार्मिक इस्लामिक नेत्याचे नाव समोर आले होते.2012मध्ये बालीनुर्गा हिंदूंवर हल्ल्यांसह अनेक घटना धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध पाहायला मिळाल्या आहेत.

पाकिस्तानात अल्पसंख्याक धोक्यात

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे मत CDPHRच्या अध्यक्षा प्रेरणा मल्होत्रा ​​यांनी व्यक्त केली. पाकिस्तानमधील एथनिक मायनॉरिटींच्या मानवाधिकारांचे आणि धार्मिक अल्पसंख्याकांचे रक्षण होत नाहीये. पाकिस्तानमधील मुस्लिम अल्पसंख्याकांनादेखील सोडले जात नाही, असे या अहवालात आढळले आहे. त्यांच्यासाठी अल्पसंख्याक म्हणजे हिंदू-शीख किंवा ख्रिश्चन नसतात, तर उर्वरित बलुच, अहमदिया या सर्वांसाठी मानवी हक्कांना तेथे जागा नाही. इस्लामिक राज्यात तसेही अल्पसंख्याक समुदायासाठी मानवी हक्क नसतात. बांग्लादेशात तर इस्लाम एक स्टेट रिलीजन बनले आहे.

बांग्लादेशात कट्टरतावाद वाढला

पाकिस्तानप्रमाणे बांग्लादेशदेखील इस्लामिक स्टेट नाही, परंतु तेथे कट्टरतावादही वाढत असून अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. 1947 मध्ये जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानात 12.5 टक्के हिंदू होते, त्यापैकी 23 टक्के एकटे बांग्लादेशात होते. हा डेटा 1951चा आहे. आता 2011च्या आकडेवारीवर नजर टाकली तर तेथे 8 टक्के हिंदू शिल्लक आहेत. बांग्लादेशातील इतर हिंदू कुठे गेले? एकतर ते मरण पावले किंवा त्यांचे धर्मांतर झाले, नेमकं त्यांच्यासोबत काय झालं, याची काहीच माहिती नाही. पाकिस्तानात आज जेवढे हिंदू असायला हवे होते, तेवढे नाहीत. पाकिस्तानमधील हिंदूंची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. तेथे हिंदू-शीख महिलांचे विशेष करून लहान मुलींवर रेप आणि धर्मांतरण सुरू आहे. धर्मांतरणासाठी ही एक पद्धत म्हणून तेथे पाहिले जात आहे.

CDPHR Report on status of Hindus in 7 neighboring countries of India


महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात