कॉँग्रेसमधील गटबाजीमुळे आपल्याला कामच करू दिले जात नाही, हार्दिक पटेल याचा कॉँग्रेसला घरचा आहेर


कॉँग्रेसमधील गटबाजी, आपल्यामुळे नेत्यांना वाटत असलेली असुरक्षितता यामुळे आपल्याला कामच करू दिले जात नाही. सातत्याने डावलले जात आहे, असा आरोप पाटीदार नेता हार्दिक पटेल याने केला आहे.We are not allowed to work due to groupism in the Congress, Hardik Patel said


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : कॉँग्रेसमधील गटबाजी, आपल्यामुळे नेत्यांना वाटत असलेली असुरक्षितता यामुळे आपल्याला कामच करू दिले जात नाही. सातत्याने डावलले जात आहे, असा आरोप पाटीदार नेता हार्दिक पटेल याने केला आहे.

हार्दिक पटेल याने गेल्या वेळी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु, पाटीदारांचा गड समजल्या जाणाऱ्या सुरतमध्ये कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला. आम आदमी पक्षापेक्षाही कॉँग्रेसला कमी जागा मिळाल्या.



यामुळे हार्दिक पटेल याच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर कॉँग्रेस नेत्यांकडूनच शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्यांच्यावर पलटवार करताना हार्दिक पटेल म्हणाला, मला काही कामच दिले जात नाही. कारण माझ्यामुळे कॉँग्रेसमधील अनेक जण स्वत:ला असुरक्षित मानू लागले आहे.

त्यामुळे कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष हे पद आपण सोडण्यासही तयार आहेोत. मला कार्याध्यक्षपद नको,अध्यक्षपद नको अगदी मंत्री,मुख्यमंत्रीही व्हायचे नाही. मला काम करायचे आहे. परंतु, मला काम तर द्यायला पाहिजे.

गुजरातमध्ये बेरोजगारीपासून ते शेतकऱ्याची अस्वस्थता आणि आरोग्य सुविधांपर्यंत अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न घेऊन कॉँग्रेसने लढायला हवे. परंतु, पक्षातील गटबाजीमुळे कोणीही संघर्ष करायला तयार नाही. मी काही करायला लागलो तर पक्षाच्याच लोकांना असुरक्षित वाटायला लागते. त्यामुळे ते मला कामच करू देत नाहीत.

गांधीजी आणि सरदार पटेल यांचा विचार जीवंत ठेवायचा असेल तर कॉँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या एसी ऑफीसमधून बाहेर पडून रस्त्यावर आले पाहिजे. गुजरातमधील जनता आम्हाला आपोआप स्वीकारेल असे होणार नाही.

त्यासाठी आम्ही रस्त्यावर त्यांच्यासाठी संघर्ष करतोय असे त्यांना दिसले पाहिजे. परंतु, कॉँग्रेसच्या गुजरातमधील नेत्यांना हे करायचे नाही. काम केले नाही तर कॉँग्रेसला कायमच विरोधात बसावे लागणार आहे. पण हे येथील नेत्यांच्या लक्षातच येत नाही.

We are not allowed to work due to groupism in the Congress, Hardik Patel said

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात