Devendra fadnavis महाविजयानंतर फडणवीस मुख्यमंत्री होणार की दिमाखात दिल्ली गाठणार??; दोन इंडिकेटर्स काय सांगतात??


नाशिक : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाविजय मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्या चर्चेला विधान परिषदेतले नेते प्रवीण दरेकर आणि फडणवीसांच्या मातोश्रींनी दुजोरा देखील दिला. त्यामुळे फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाल्याचे लोक मानायला लागले. माझा मुलगा महाराष्ट्राचा नेता झाला. याचा आनंद आहे. तो मुख्यमंत्री होईल, असे सरिता फडणवीस म्हणाल्या.

पण स्वतः फडणवीसांनी मात्र थोडक्यात प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि महायुतीच्या घटक पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला आधीचे वळण दिले. कारण संघ आणि भाजप परिवारात घरातल्या कुणी सांगितले म्हणून कुठले निर्णय घेतले जात नाहीत, हे त्यांना माहिती आहे. त्याचवेळी फडणवीसांनी महाराष्ट्राच्या जनतेचे, भाजप नेतृत्वाचे, बाकीच्या टीमचे आभार मानले. आम्ही महायुती आधुनिक अभिमन्यू आहोत. त्यामुळे आम्ही चक्रव्यूह भेदला, असा टोला फडणवीसांनी शरद पवारांना हाणायला कमी केले नाही.

पण फडणवीस मुख्यमंत्री होणार की दिमाखात दिल्ली गाठणार??, या प्रश्नाचे नेमके उत्तर त्यांनी दिले नाही. फडणवीस संघटनेत मुरलेले नेते असल्याने त्यांच्या तोंडून “लूज टॉक” देखील झाले नाही.

– दोन इंडिकेटर्स

पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदा संदर्भात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मध्यंतरी दोन इंडिकेटर्स दिले होते. महाराष्ट्रात चर्चेत नसलेला चेहरा मुख्यमंत्री होऊ शकतो, असे ते म्हणाले होते. यासाठी त्यांनी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडची उदाहरणे दिली होती. ती राज्ये भाजपने जिंकल्यावर पक्षाने तिथे नवीन चेहरेच मुख्यमंत्रीपदासाठी दिले, याची आठवण विनोद तावडे यांनी करवून दिली. हा इंडिकेटर महत्त्वाचा आहे.

त्याचबरोबर भाजपच्या केंद्रीय नेत्यांची महत्त्वाची बैठक परवाच म्हणजे 25 नोव्हेंबर रोजी दिल्लीत होत आहे यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यासाठी दिल्लीतल्या वर्तुळाच फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्रात फडणवीसांनी महायुतीला महाविजय मिळवून दिला एका अर्थाने जे साध्य करायचे होते, ते झाले. आता महाराष्ट्रापुरते सीमित न राहता किंवा न ठेवता भाजपचा थेट केंद्रीय राजकारणात दिमाखात जायची संधी फडणवीसांना मिळणार का??, हा सवाल आहे.

20 नोव्हेंबरला मतदान संपला त्या दिवशी सायंकाळी फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची नागपूरात भेट घेतली होती. ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात होती, की भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदा संदर्भात होती, हे गुलदस्त्यातच आहे. कारण फडणवीसांनी त्या भेटीचा कुठलाही खुलासा केला नाही. मोहन भागवतांनी तसला खुलासा करण्याचे कारण नाही. कारण मूळात ती संघाची कार्यपद्धती नाही.

पण वर उल्लेख केलेल्या दोन इंडिकेटर्स मधून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या महाविजयानंतर राज्याचे नेतृत्व इतर कोणाकडे तरी सोपवून दिल्लीच्या राजकारणात प्रवेश करायला तिकडे जातील, संघ परिवारातले वरिष्ठ नेतृत्व फडणवीसांच्या संदर्भात “व्यापक” निर्णय घेतील, असे आजतरी चित्र दिसत आहे.

Devendra fadnavis will become CM or enter into national politics??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात