Devendra Fadnavis उद्धव ठाकरेंचा डोक्यावरचा ताबा सुटला; फडणवीसांनी हाणला टोला!!

devendra fadnavis target to uddhav

विशेष प्रतिनिधी

नागपूर : मी ढेकणांना आव्हान देत नाही. देशाचे गृहमंत्री अमित शाह (amit shah) अहमदशाह अब्दालीचे राजकीय वंशज आहेत, अशी उद्धव ठाकरे यांची जीभ आज सैल सुटली होती, त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकच हाणला, पण सॉलीड हाणला!! उद्धव ठाकरे यांचा स्वतःच्या मेंदूवरचा ताबा सुटल्याचे निदान फडणवीस यांनी केले. devendra fadnavis target to uddhav

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे हे हताश निराश झाले. त्यांच्या डोक्यावरचा ताबा सुटलाय. आपण औरंगजेब फॅन क्लबचेच मेंबर आहोत हे आज त्यांनी दाखवून दिले, असे प्रत्युत्तर फडणवीसांनी दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले,  उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटलाय. ते सध्या अत्यंत फ्रस्ट्रेशनमध्ये आहे. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते  ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे, त्यावर आपण काय उत्तर देणार?? एखादी व्यक्ती फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखे बोलत असते, त्यावेळी त्याला उत्तर द्यायचे नसते. पण हे भाषण करून त्यांनी आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे त्यांनी दाखवून दिले!!

अनिल देशमुख, जयंत पाटलांनी वसुली करायला सांगितले. त्याचे पुरावे सचिन वाझेने सीबीआयला दिले. सचिन वाझेने माझी नार्को टेस्ट करा, असे म्हटले. याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पण माध्यमातून बघितले आहे. त्यांनी मला पत्र पाठवले तुमच्या माध्यमातूनच पहिले. अजून मी काही पाहिले नाही. कारण मी दोन दिवस नागपुरात आहे. असे काही आले असेल तर मी ते पाहून त्याच्यावर प्रतिक्रिया देईल. जे काही समोर येत आहे त्याची योग्य चौकशी करू.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

पुण्यात झालेल्या मेळाव्यात आज उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाह हे अहमदशाह अब्दालीचे वंशज आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली, तर भाजपचा राज्यात सत्ता जिहाद सुरू आहे असं ते म्हणाले.  उद्धव ठाकरे म्हणाले, आजपासून मी अमित शाहला अहमदशहा अब्दाली म्हणणार आहे. तो मला नकली संतान म्हणतो, औरंगजेब फॅन क्लब म्हणतो तर मी देखील त्याला अहमदशहा अब्दाली म्हणणार. तो अहमदशहा अब्दालीच आहे. त्याला घाबरायचे कारण नाही. ज्या पद्धतीनं औरंगजेबाची इथे कबर बांधली तशी भाजपची राजकीय कबर बांधा.

devendra fadnavis target to uddhav

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात