विशेष प्रतिनधी
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. रामदासभाई वारंवार टोकाचे बोलतात. त्याने आमचे मनं देखील दुखावले जातात. शेवटी आम्हीही माणसं आहोत.
50 गोष्टी आम्हालाही त्याच्या उत्तरावर बोलता येतील. जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी पथ्य पाळावे. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बाेलणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. चमकोगिरी करणारे कुचकामी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मंत्रिपदाचा देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घ्यायला हवा, असा म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपाला जर राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर युती तोडावी तुम्ही तुमचे लढा, आम्ही आमचे लढू, असेही कदमांनी म्हटले.
कदम यांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आम्हीही माणसं आहोत, आमचीही मनं दुखावतात. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकारचे आरोप करणे हे कुठल्या युती धर्मात बसते. त्यामुळे जर रामदास भाईंचे काही म्हणणे असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडले पाहिजे. प्रत्येक वेळी भाजपला, भाजपच्या नेत्यांना अशा प्रकारे वेठीस धरणे यातून एक चांगली भावना तयार होत नाही, असे मला वाटते. तरी मी भाईंचे काय म्हणणे आहे हे समजून घेईल आणि त्यातून मार्ग काढेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, असा हल्लाबोल करत देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदमांनी केली आहे. गेल्या 14 वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत नाही. चाकरमान्यांचे हाल होत आहेत. समृद्धी महामार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण होते. मग मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण का होत नाही? असा प्रश्न रामदास कदमांनी उपस्थित केला हाेता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App