विशेष प्रतिनिधी
नागपूर : ऊर्जा विभागात पुढच्या 25 वर्षाचा रोड मॅप तयार केला. दोन वर्षात अशी परिस्थिती येईल की उद्योगासहीत सर्व प्रकारच्या विजेचे (इलेक्ट्रीसिटी) दर कमी करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन सांगितले. ते म्हणाले, जलसंधारण विभागाने सहा नदी जोड प्रकल्प कामे हाती घेतले आहे. त्याने महाराष्ट्र बदलून जाणार आहे. विदर्भातील 80 प्रकल्प पूर्ण केले. त्याचवेळी पश्चिम महाराष्ट्र, कोकण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. आपण पाच वर्षात मोठी भरारी मारली. गेल्या अडीच वर्षात उपमुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली. तेव्हा ऊर्जा, गृह खात्यात चांगलं काम केलं.
काम करताना काही अडचणी आणि मर्यादा असतात. पण त्यावर मात करून जनतेच्या मनातील कामे झाली पाहिजेत, हा प्रयत्न करायचा आहे. 2014 मध्ये मुख्यमंत्री असताना अनेकांच्या मनात अनेक शंका होत्या. काही लोकांना वाटायचं हा मंत्री नव्हता मुख्यमंत्री म्हणून काम कसा करेल. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना वाटायचं सातत्याने विदर्भाच्या प्रश्नावर बोलणारा व्यक्ती पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करायचा का? पण माझ्या पाच वर्षाच्या काळात विदर्भासाठी काम केलं. पण महाराष्ट्रातील कोणत्याच भागावर अन्याय होऊ दिला नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
छगन भुजबळ ते अभयसिंहराजे भोसले; राष्ट्रवादीतल्या खच्चीकरणाचे किस्से, त्यांच्याच नेत्यांनी चव्हाट्यावर आणले!!
ते म्हणाले, भारतातील भविष्यातील स्टिल सिटी म्हणून गडचिरोली उदयाला येईल. काल दोन नक्षलवाद्यांनी समर्पण केलं आहे. आपण ज्या भागात जात नव्हतो, तिथे जात आहे. पुढच्या काळात निकराची लढाई होईल. गडचिरोली सारखं क्षेत्र आपण बदलणार आहोत. विदर्भात ज्या प्रकारे गुंतवणुकीच्या संधी दिसत आहे, त्यातून विदर्भालाही औद्योगिक इको सिस्टिम उभी राहणार आहे. हे सर्व आव्हानं आहेत. हे करत असताना आम्ही ज्या योजना सुरू केल्या आहेत. त्याही आम्हाला चालवायच्या आहेत. या योजनांचा भार आमच्या अर्थ संकल्पावर पडेल. पण त्यांचही नियोजन करत आहोत.
लाडकी बहिण योजनेवरून योजनेवरून टीका करणाऱ्यांना सुनावताना फडणवीस म्हणाले, आम्ही ज्या काही योजना सुरू केल्या आहेत त्या योजनादेखील आम्हाला चालवायच्या आहेत. या योजनांचा भार हा आमच्या अर्थसंकल्पावर पडेल, पण त्यांचंही नियोजन आम्ही योग्य प्रकारे करत आहोत. कोणच्याच मनात शंका राहू नये म्हणून लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलं आहे. तोही सर्व खात्यात लवकर जमा होईल,असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीपुरतं हे योजनेचं आश्वासन न राहता यापुढेही ती योजना सुरूच राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App