विशेष प्रतिनिधी
अमरावती : त्रिपुरा येथील घटनेनंतर महाराष्ट्रात मालेगाव, नांदेड आणि अमरावती येथे मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर राज्यात हिंसाचार झाला आहे. १११ ठिकाणी त्रिपुरा घटनेचा निषेध केला आहे. सरकारी कार्यालये व अधिकारी यांचेकडे निवेदने सादर झाली. पण या मोर्चादरम्यान हिंसक घटना घडल्या. भाजपाने अमरावती येथे बंद पुकारला होता. तेथे समाजकंटकांनी दगडफेक केली व नउ लोक जखमी झाले. यात पाच पोलीस होते. काही धार्मिक ठिकाणी गोंधळ झाल्याने वातावरण बिघडले. पोलीसांनी लाठीमार व अश्रुधुराचा वापर करून जमाव पांगवला. महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस अमरावती येथे आले व घटनास्थळी जाऊन नागरिकांकडून माहिती घेतली.
Devendra Fadnavis has demanded an inquiry into the Amravati violence
देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले की, हे मोर्चे कोणी आयोजित केले याची चौकशी झाली पाहिजे. खोट्या माहितीच्या आधारे सदर आयोजन केले आहे. या मोर्चाचे आयोजन करण्यात काय उद्देश होता? दंगल घडवणे ही भुमिका होती का? अमरावती येथील घटना दुर्देवी आहेत. राज्यभरात कारस्थान करून चुकीच्या माहिती आधारे १२ नोव्हेंबरला मोर्चा काढला गेला. सोशल माध्यमातून त्रिपुराबाबत खोटी माहिती पसरवली गेली. समाजात असंतोष निर्माण झाला. एकाच दिवशी राज्याच्या वेगवेगळ्या गावांत असे मोठे मोर्चे काढले गेले यावरून ते नियोजित होते. प्रथम खोट्या माहितीच्या आधारे कोणी आयोजित केले याची चौकशी झाली पाहिजे. देशात तसेच राज्यात अराजकता करायची होती का? दंगल व्हावी म्हणून आयोजन होते का याची चौकशी व्हावी असे फडणवीस म्हणाले.
AMRAWATI VIOLANCE : अमरावतीत चार दिवस कर्फ्यू; शहरातील इंटरनेट सेवाही बंद
या मोर्चाला कोणत्या कारणाने परवानगी दिली याचीही चौकशी केली पाहिजे. समाजकंटकांनी दुकाने आणि लोकांना ज्याप्रकारे लक्ष्य केले व हल्ला केला त्यामुळे अमरावती येथील परिस्थिती बिघडली असेही फडणवीस यांनी सांगितले. १२ तारखेच्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून १३ तारखेला घटना घडली. मी १३ तारखेच्या हिंसेचे समर्थन करत नाही. पण १३ तारखेची घटना पुढे आणण्याचा जो प्रयत्न सरकार, अमरावतीचे पालकमंत्री आणि अधिकारी करत आहेत ते चुकीचे आहे. “१३ तारखेला जे घडलं त्यामुळे दुसऱ्या दिवशी घटना घडल्या. पण कारवाई मात्र १३ तारखेला जे घडले त्यावर चालली आहे. विशिष्ट धर्माला लक्ष्य करणे आम्हाला मान्य नाही. पण लांगुलचालन चुकीच्या घटनांकरीता होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App