आजारपणातून बरे होण्यास आणखी किती दिवस लागणार याबाबतही दिली आहे माहिती
विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे डेंग्यूमुळे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. परिणामी ते कोणत्याच सार्वजनिक कार्यक्रमास हजर राहू शकलेले नाहीत. मराठा आंदोलनामुळे राज्यात वातावरण तापलेलं असताना, अजित पवार गायब झाल्याचे पाहून जनतेमधून विविध प्रतिक्रिया उमटत होत्या.Deputy Chief Minister Ajit Pawar gave an important update regarding the illness
शिवाय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार पातळीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आयोजित बैठकांमध्येही त्यांची अनुपस्थिती दिसल्याने, राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: ट्वीटद्वारे आपल्या आजरपणाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
कांदाप्रश्नी 29 सप्टेंबरला दिल्लीत बैठक, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय
अजित पवार म्हणतात, ”गेल्या काही दिवसांपासून मी डेंग्यूमुळे आजारी असून डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार आणि सक्तीची विश्रांती घेत आहे. आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. पूर्णपणे बरं होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.”
याशिवाय, ”डॉक्टरांनी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसंच मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. आजारपणामुळे आपल्या सर्वांपासून नाईलाजानं दूर रहावं लागणं हे त्रासदायक आहे. दरवर्षी दिवाळीत मी आपल्या सर्वांना भेटत असतो. दिवाळी पाडवा स्नेहमिलनाच्या निमित्तानं भेटीगाठी, शुभेच्छांची देवाण-घेवाण होत असते. यावर्षी पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला भेटता येणार नाही.”
याचबरोबर, ”माझ्या सदिच्छा कायम आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, नातेवाईक आणि मित्र परिवाराला दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश, धनधान्याची समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो अशी प्रार्थना करतो.” अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी भावना मांडल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App