दसरा मेळाव्याचा राजकीय प्रवास : बाळासाहेबांचे काँग्रेस – राष्ट्रवादीवर असूड ते उद्धव – एकनाथांचा एकमेकांवर सूड!!


विशेष प्रतिनिधी

2022 सालचे दोन्ही दसरा मेळावे प्रचंड गाजले. दोन्ही मेळाव्यांमध्ये ठाकरे – शिंदे गटांनी एकमेकांवर जोरदार तोंडसुख घेतले… पण या दसरा मेळाव्याचा राजकीय प्रवास मात्र बाळासाहेबांचे काँग्रेस – राष्ट्रवादीवरचे कठोर असूड ते उद्धव एकनाथांचा एकमेकांवर सूड!!, असाच झाल्याचे स्पष्ट दिसले.Dasara Rallies : Balasaheb Thackeray used to fearlessly target Congress – NCP, but Uddhav Thackeray and Eknath Shinde targeted each other, it’s the irony of Shivsena!!

वास्तविक दसरा मेळावा ही बाळासाहेबांच्या शिवसेनेची खासियत. निवडणुका असोत किंवा नसोत, कुठलेही राजकीय प्रयोजन असो अथवा नसो… लाखो शिवसैनिक फक्त आणि फक्त बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठीच दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर जमत असत. लाखोंच्या संख्येने होणाऱ्या बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यासाठी हजारो गाड्यांच्या “व्यवस्था” शिवसेनेला कधी कराव्या लागल्या नाहीत. बाळासाहेबांच्या आवाहनाप्रमाणे नाचत, गुलाल उधळत लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर लोटायचे आणि बाळासाहेब देखील त्यांच्या नेहमीच्या ठाकरे शैलीत काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अक्षरशः असूड ओढायचे… शिवसैनिक टाळ्या शिट्ट्यांच्या गजरात त्यांना जोरदार प्रतिसाद द्यायचे. त्याची आठवण शहाजी बापू पाटलांनी बीकेसी मधल्या मेळाव्यात आवर्जून करून दिली.



बाळासाहेब खरंच टीकेचे आसूड ओढताना “मैद्याचं पोतं”, “बारामतीचा म्हमद्या”, “दाऊदचा हस्तक”, असे बेधडक बोलायचे… सोनिया गांधीचे इटालियन एक्सेंट मधले हिंदी भाषण नकलून वाचायचे. बाळासाहेबांच्या या ओघवत्या शैलीमुळे तर बाळासाहेबांचे सगळे दसरा मेळावे गाजले. बाळासाहेबांनी ओढलेले टीकेचे असूड त्यांच्या विरोधकांना प्रचंड घायाळ करून गेले. विरोधकांच्या पदरात बाळासाहेबांनी सतत राजकीय अपयश घातले आणि बाळासाहेब स्वतः “अजेय” ठरले!!… बाळासाहेब खऱ्या अर्थाने राजकीय ब्रँड बनले!!

 

पण 2022 च्या दसरा मेळाव्यात चित्र काय दिसले??… शिवसेनेच्याच दोन्ही गटांचे दसरा मेळावे यशस्वी झाले. म्हणजे गर्दीने “यशस्वी” केले. टीकेचे असूड तर इथेही ओढले गेले, पण ते असूड बाळासाहेबांचा पुत्र आणि बाळासाहेबांच्याच पठ्ठ्यांनी एकमेकांवरच ओढले. शिंदे गटातील नेत्यांनी अधून मधून काँग्रेस – राष्ट्रवादीवर टीकेचे असूड जरूर ओढले, पण मुख्य असूड बाळासाहेबांच्या पुत्राच्या नेतृत्वाखाली शिवसेनेवर ओढले.

बाळासाहेबांच्या पुत्राचा असूड तर बाळासाहेबांच्या पठ्ठ्यांच्या शिवसेनेवर चालणार हे उघड होते आणि तो फक्त त्यांच्यावरच चालला हेही दिसले. नाही म्हणायला अधून मधून मोहन भागवत, दत्तात्रय होसबळे वगैरे नावे उद्धव ठाकरेंनी घेतली. “खोकासूर”, “धोकासूर” हे नवे शब्द मराठीला दिले… पण ठाकरेंचा मेळावा सुषमा अंधारांनी गाजवल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. यातच बरेच काही “इंगित” आले.

याच अर्थ असा की, दसरा मेळाव्याचा हा राजकीय प्रवास बाळासाहेबांचे काँग्रेसवर आणि राष्ट्रवादीवर टीकेचे आसूड ते उद्धव – एकनाथांचे एकमेकांवर सूड!!, असाच दिसला… पण या सर्वांत हे दोन्ही दसरा मेळावे राजकीय दृष्ट्या “एन्जॉय” कुणी केले??… तशी “एन्जॉयमेंटची” संधी त्यांना कोणी उपलब्ध करून दिली??, हे समजायला फार मोठा राजकीय अभ्यास करण्याची गरज नाही… ते बाळासाहेबांच्या असूडांमधून आणि शहाजीबापूंनी सांगितलेल्या आठवणी मधून अवघ्या महाराष्ट्राला समजले आहे!!

Dasara Rallies : Balasaheb Thackeray used to fearlessly target Congress – NCP, but Uddhav Thackeray and Eknath Shinde targeted each other, it’s the irony of Shivsena!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात